Tuesday, January 21, 2025 03:16:18 AM

आशिष शेलारांनी घेतली सलमान खानची भेट

आशिष शेलारांनी घेतली सलमान खानची भेट

मुंबई , ८ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.अशातच अलीकडेच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी अभिनेता सलमान खानची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चांना उधाण आलंय.

उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदार संघासाठी पुनम महाजन यांच्या जागी आशिष शेलार यांना उमेदवारी देण्यात येणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून जोर धरू लागलाय. त्यामुळे या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण सलमान खान देखील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात राहतो. आशिष शेलार यांनी काल दुपारी भेट घेतली यावेळी सलमानचे वडील सलीम खान देखील उपस्थित होते. यावेळी लंच डिप्लोमसी झाल्याचे पाहायला मिळाली. सलमान आणि आशिष यांच्या भेटीचे फोटो स्वत: आशिष शेलार यांनी हे ट्वीट केले आहे. त्यामुळे आशिष शेलार खरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री