अभिनेता सलमान खानच्या गोळीबार झाल्याची बातमी आली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर आज म्हणजेच रविवारी पहाटे ५ च्या सुमारास हि घटना घडली. साड्या घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, 2 अज्ञात हेल्मेट घालून दुचाकीवर गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ दाखल झाले होते.त्यांनंतर त्यांनी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 4 राऊंड फायरिंग अर्थात गोळीबार केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतू सदर प्रकरणी सलमानच्या घराजवळीस सीसीटीव्हीच्या आधारे वांद्रे पोलिसांकडून 2 अज्ञातांचा शोध घेतला जातोय. त्यामुळे हा गोळीबार नेमका कोणी केला? कुठल्या उद्देशाने ते आले होते ? याचा लवकरच उलगडा होईल