Avika Gor Engagement: 'बालिका वधू' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये 'आनंदी' या भूमिकेने चाहत्यांची मने जिंकणारी अविका गोरचा साखरपुडा झाला आहे. अभिनेत्रीने तिचा प्रियकर मिलिंद चांदवानीसोबत साखरपुडा केला आहे. या समारंभाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अविका आणि मिलिंदच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर चाहते या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.
अविकाचा साखपुड्यातील सुंदर लूक -
अविका गोरने तिच्या साखरपुड्याच्या समारंभासाठी सुंदर गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. यासह, तिने स्लीव्हलेस ब्लाउज घातला होता. तथापी, गुलाबी रंगाचा हार आणि कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला होता. अविकाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यापैकी एका फोटोमध्ये मिलिंद तिला अंगठी घालताना दिसत होता, तर दुसऱ्या फोटोमध्ये अविका मिलिंदच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहे.
अविकाने शेअर केले साखरपुड्याचे फोटोज -
दरम्यान, अविकाने साखरपुड्याचे फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, 'त्याने विचारले, मी हसले आणि नंतर रडू लागले. मी पूर्णपणे फिल्मी आहे. तो तार्किक आहे, शांत आहे. मी नाटक साकारले होते. त्याने विचारताच माझ्या आतली नायिका बाहेर आली. हवेत हात, डोळ्यात अश्रू आणि मनात शून्य नेटवर्क. ते नेहमीच परिपूर्ण असू शकत नाही, परंतु ते सर्व जादूई होते.'
हेही वाचा - शाहरुख खानच्या 'या' गाण्याचे चित्रीकरण कोणत्या समुद्रकिनाऱ्यावर झालंय? जाणून घ्या
अविका-मिलिंदची प्रेमकहाणी
अविका आणि मिलिंद चांदवानीची प्रेमकहाणी हैदराबादपासून सुरू झाली. दोघेही पहिल्यांदा हैदराबादमध्ये एका कॉमन फ्रेंडद्वारे भेटले. नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. आता पाच वर्षांच्या डेटिंगनंतर, दोघांनीही साखरपुडा करून त्यांच्या नात्याची पुष्टी केली आहे.
हेही वाचा - '20 वर्षांपूर्वी राज ठाकरेंवर क्रश होता का?'; यावर अभिनेत्री सोनाली बेंद्रे म्हणाली...
कोण आहे मिलिंद चांदवान?
मिलिंद चांदवानी हे कुकू एफएममध्ये वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते 'कॅम्प डायरीज' नावाची एक एनजीओ देखील चालवतात. मिलिंद चांदवानी या एनजीओचा संस्थापक आहे. त्यांनी डीएससीई, बंगळुरू येथून बीई केले आणि नंतर अहमदाबाद आयआयएममधून एमबीए केले. 2019 मध्ये 'एमटीव्ही रोडीज रिअल हीरोज' मध्ये भाग घेतल्यावर मिलिंद प्रसिद्धीच्या झोतात आला.