Saturday, February 14, 2026 03:29:12 AM

King Release Date : रक्ताने माखलेला शर्ट, डोळ्यांत राग...'या' दिवशी प्रदर्शित होणार शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'किंग' चित्रपट

'किंग' चित्रपटाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शनिवारी निर्मात्यांनी या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा पहिला लूक आणि प्रोमो प्रदर्शित केला आहे.

king release date  रक्ताने माखलेला शर्ट डोळ्यांत रागया दिवशी प्रदर्शित होणार शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित किंग चित्रपट

King Release Date : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'किंग' चित्रपटाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शनिवारी निर्मात्यांनी या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा पहिला लूक आणि प्रोमो प्रदर्शित केला आहे. 24 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, शाहरुख पुन्हा एकदा हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन मोडमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.

रक्ताने माखलेला शाहरुख आणि 'पठाण' फेम जोडी

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये शाहरुख खान अत्यंत धोकादायक लूकमध्ये दिसत आहे. रक्ताने माखलेला पांढरा शर्ट आणि डोळ्यांतून ओसंडून वाहणारा राग, अशा अवतारात तो एका इमारतीवर हल्ला करताना दिसतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. यापूर्वी शाहरुख आणि सिद्धार्थ आनंद या जोडीने 'पठाण' चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. आता ही जोडी पुन्हा एकदा 'किंग' च्या माध्यमातून बॉलिवूडचे सर्व रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज झाली आहे.

बड्या कलाकारांची फौज आणि सुहाना खानचे पदार्पण

या चित्रपटात केवळ शाहरुखच नाही, तर तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा शाहरुखसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, जयदीप अहलावत, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला आणि राघव जुयाल हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शाहरुखची मुलगी सुहाना खान या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आपल्या वडिलांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. नेटफ्लिक्सवरील 'द आर्चीज' नंतर सुहानासाठी हा चित्रपट करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो.

हेही वाचा - Celebrity Harassment: एका कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत वृद्धाचे लाजिरवाणे कृत्य; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘त्यांनी थेट माझ्या शरीरावर…’

बॉक्स ऑफिसवर पुन्हा इतिहास रचणार?

शाहरुख खानचा 'पठाण' आजही बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 चित्रपटांपैकी एक आहे. त्यानंतर आता 'किंग' कडूनही अशाच मोठ्या अपेक्षा आहेत. शाहरुखचा हा नवा अ‍ॅक्शन अवतार आणि सिद्धार्थ आनंदचे दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट 24 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर नक्कीच धुमाकूळ घालेल, असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. सुहानाच्या भूमिकेबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात आली असली तरी, लवकरच रिलीज होणाऱ्या टीझरमध्ये तिची झलक पाहायला मिळेल.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या