Saturday, February 14, 2026 01:20:13 PM

Dhurandhar Song Record: 'धुरंधर'चा जगभरात डंका! 'या' गाण्याने मोडले जगातील सर्व विक्रम

या गाण्याने बिलबोर्ड अरेबिया चार्टमध्ये सर्वात जास्त काळ राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, एकाच वेळी चार वेगवेगळ्या चार्ट्समध्ये या गाण्याने अव्वल स्थान पटकावले आहे.

dhurandhar song record धुरंधरचा जगभरात डंका या गाण्याने मोडले जगातील सर्व विक्रम

Dhurandhar Song Record: बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंगचा 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मनेच जिंकली नाहीत, तर जागतिक स्तरावर एक नवा इतिहासही रचला आहे. या चित्रपटातील 'फा९ला' (Fa9la) या गाण्याने चक्क 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये (Guinness World Record) आपले नाव नोंदवले असून, संगीत विश्वात खळबळ उडवून दिली आहे.

गाण्याचा जागतिक विक्रम आणि यश
बहरैनी संगीतकार आणि रॅपर फ्लिपराची याने गायलेले 'फा9ला' हे गाणे केवळ डान्स प्रेमींमध्येच नाही, तर जगभरातील संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरले आहे. या गाण्याने बिलबोर्ड अरेबिया चार्टमध्ये सर्वात जास्त काळ राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, एकाच वेळी चार वेगवेगळ्या चार्ट्समध्ये या गाण्याने अव्वल स्थान पटकावले आहे.

हेही वाचा - Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ; बंगळुरू पोलिसांकडून FIR दाखल

रॅपर फ्लिपराचीची भावूक प्रतिक्रिया
आपल्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी फ्लिपराचीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो म्हणाला, "गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, हबीबी! ही एक अद्भुत भावना आहे." ज्या भाषेत (हिंदी) हे गाणे मूळतः नव्हते, त्या भाषेत आणि वेगळ्या संस्कृतीत गाण्याला इतके प्रेम मिळणे हे आपल्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, अशी भावना त्याने व्यक्त केली.

'धुरंधर'च्या यशामुळे फ्लिपराचीला भारतात प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. आपल्या भारतीय चाहत्यांसाठी त्याने एक मोठी घोषणा केली आहे. रॅपर फ्लिपराची 14 मार्च 2026 पासून आपला भारत दौरा (India Tour) सुरू करणार आहे. त्याने स्वतः इंस्टाग्रामवर ही माहिती शेअर केल्याने भारतीय संगीतप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या