Tuesday, November 18, 2025 02:58:52 AM

Abhishek Bachchan: अभिषेकला मिळाला बेस्ट एक्टर फिल्मफेअर अवॉर्ड, सोहळ्यात पत्नी ऐश्वर्याच्या अनुपस्थितीने चर्चांणा उधाण

70 व्या ह्युंदाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2025 मध्ये बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनला बेस्ट एक्टर फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.

abhishek bachchan अभिषेकला मिळाला बेस्ट एक्टर फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात पत्नी ऐश्वर्याच्या अनुपस्थितीने चर्चांणा उधाण

मुंबई: 70 व्या ह्युंदाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2025 मध्ये बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनला बेस्ट एक्टर फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. 'आई वांट टू टॉक' सिनेमासाठी त्याला हा अवॉर्ड मिळाला. यावेळी अवॉर्ड फंक्शनमध्ये आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने अभिषेकने सर्वांची मने जिंकून घेतले. पण त्याच्या एका कृतीने सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं.

या संपूर्ण सोहळ्यातील एक क्षण  सर्वात भावनिक ठरला तो म्हणजे, जेव्हा अभिषेकने स्टेजवरून खाली उतरून थेट त्याची आई जया बच्चनकडे आला. जया यांना मिठी मारली आणि थोडा डान्स करायला लावला. आई-लेकाचं बॉन्डिंग पाहून सर्वांनी अभिषेकचं खूप कौतुक केलं. त्याला बेस्ट एक्टर सोबत बेस्ट सनही म्हटलं.

यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील खास होता. याच निमित्ताने अभिषेक बच्चनने स्टेजवर आपल्या वडिलांच्या गाण्यांवर एक खास परफॉर्मन्स केला. तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या जया बच्चन, मुलगी श्वेता नंदा आणि नात नव्या नवेली नंदा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. जया बच्चन यांचे हास्य आणि मुलाचा परफॉर्मन्स बघून अभिमानाने फुलून आलेला चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला.

दरम्यान अभिषेक बच्चन आणि जया यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 
व्हायरल झाल्यानंतर काहींनी ऐश्वर्याची आठवण झाली. सर्वांनी ऐश्वर्या कुठे आहे? ती का तुझ्या स्पेशल अवॉर्डवेळी नाही? असे प्रश्न विचारले? त्यामुळे पुन्हा एकदा या जोडप्याविषयी चर्चा रंगली आहे.


सम्बन्धित सामग्री