मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात अखेर तिसऱ्या दिवशी पोलिसांना यश मिळालं आहे. याप्रकरणी पोलिसांची वेगवेगळी पथकं तपास करत होती. आरोपीला न्यायालयात हजर केल्यावर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यादृष्टीने आता तपासाची चक्रे फिरू लागली आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
आरोपी बांगलादेशी घुसखोर
आरोपी 5 ते 6 महिन्यापूर्वी मुंबईत आल्याची पोलिसांची माहिती
काही दिवसांपूर्वी तो मुंबईच्या काही भागांमध्ये काम करत होता
त्यानंतर तो परत गेला आणि १५ दिवसांपूर्वी तो मुंबईत परत आला
तो हाऊसकिपिंग एजन्सीमध्ये काम करत होता
तो भारतीय असल्याचे त्याच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत
भारतामध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्यानंतर आरोपीने आपले नाव बदललंय
त्याने विजय दास असं नाव ठेवलंय
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरमधील जनआक्रोश मोर्चातून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
आरोपीला अटक केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. आरोपी बांगलादेशी असल्याचे तपासात आढळून आल्यावर बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सैफवरील हल्ला नेमका कोणत्या उद्देश्याने केला होता. याचा तपास सध्या सुरू आहे. सैफच्या घरातील लोकांच्या जबानीतून पोलिसांना अधिक माहिती मिळत असून पोलीस अद्याप कोणत्याही नित्कर्षापर्यंत पोहोचले नसल्याने त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती तपास यंत्रणांकडून मिळत नसल्याने या हल्ल्याचे गूढ अद्याप कायम आहे.