Monday, November 04, 2024 10:23:48 AM

Govinda
गोविंदा रुग्णालयातून घरी परतला

हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा पायाला गोळी लागल्यामुळे जखमी झाला होता. वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे आता त्याची प्रकृती स्थिर आहे. गोविंदाला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे.

गोविंदा रुग्णालयातून घरी परतला

मुंबई : हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा पायाला गोळी लागल्यामुळे जखमी झाला होता. वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे आता त्याची प्रकृती स्थिर आहे. गोविंदाला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. गोविंदाच्या घरात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

अभिनेता गोविंदाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे एक रिव्हॉल्व्हर आहे. या शस्त्राचा परवाना त्याच्याकडे आहे. शस्त्र कपाटात ठेवले होते. हे शस्त्र कपाटातून काढत असताना चुकून गोळीबार झाला असे गोविंदाने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात गोविंदाला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांच्या गोविंदाने दिलेल्या उत्तरांनी अद्याप पोलिसांचे समाधान झालेले नाही. यामुळे गोविंदाची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. 

           

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo