मुंबई : अभिनेता गोविंदा यांच्या संदर्भात धक्कादायक माहिती समोर येत आहे. गोविंदा बंदूक साफ करत असताना बंदुकीतून गोळी सुटली. बंदुकीतील गोळी गोविंदाच्या पायाला लागली. यानंतर त्याला तात्काळ क्रिटी केअर रूग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून तो सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जुहू पोलीस अधिकचा तपास करत आहेत.