उत्तरप्रदेश : बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ममता कुलकर्णीने सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल केला. त्यावेळी काही साध्वी महिलांसोबत संवाद साधताना दिसत आहेत. अभिनेत्री ममता कुलकर्णी प्रयागराजमध्ये होत असलेल्या महाकुंभला पोहोचली आहे. जिथे त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली आहे. किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बांधले जात आहे. ज्यामध्ये ममता कुलकर्णी यांना चादर पोशी विधी करून महामंडलेशेवर ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
ममता कुलकर्णी यांनी स्वत: संगमच्या काठावर स्वतःच्या हातांनी पिंड दान केले. सायंकाळी ममताचा पट्टाभिषेक सोहळा होणार आहे.ममता कुलकर्णी यांना आजपासून नवीन नाव देण्यात येत आहे. ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंद गिरी या नावाने ओळखली जाणार आहे. जुना आखाड्याचे आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णी यांना दीक्षा दिली आहे. महाकुंभमध्ये ही अभिनेत्री किन्नर आखाड्यात राहते. संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णीने आता भगवे कपडे परिधान केले आहेत. ममता कुलकर्णीने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ती शाहरुख खान आणि सलमान खानसारख्या स्टार्ससोबत दिसली होती. ममता कुलकर्णी गेली अनेक वर्षे परदेशात राहत होती. ती काही काळापूर्वी भारतात परतली होती. आता या अभिनेत्रीने महाकुंभात निवृत्ती घेतली आहे.
हेही वाचा : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष