Saturday, December 13, 2025 12:27:52 AM

Cheque Bounce Case: अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या; चेक बाउन्स प्रकरणात कोर्टाने बजावले समन्स

हे प्रकरण 2017 मधील एका लग्न समारंभाशी संबंधित आहे, जिथे अमिषा पटेलला चार गाण्यांवर परफॉर्म करण्यासाठी 11 लाख आगाऊ रक्कम देण्यात आली होती. परंतु ती कार्यक्रमाला उपस्थित राहिली नाही.

cheque bounce case अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या चेक बाउन्स प्रकरणात कोर्टाने बजावले समन्स

Cheque Bounce Case: बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद कोर्टाने 9 जानेवारी 2026 रोजी हजर राहण्याचे आदेश देत तिला चेक बाउन्स प्रकरणात समन्स बजावले आहे. हे प्रकरण 2017 मधील एका लग्न समारंभाशी संबंधित आहे, जिथे अमिषा पटेलला चार गाण्यांवर परफॉर्म करण्यासाठी 11 लाख आगाऊ रक्कम देण्यात आली होती. परंतु ती कार्यक्रमाला उपस्थित राहिली नाही. तसेच तिने आयोजकांशी संपर्क साधला नाही, असा आरोप आयोजकांनी केला आहे.

हेही वाचा - The Family Man Season 3 Trailer Launch: ट्रेलर लॉंचमध्ये फॉल मोव्हमेन्टची चर्चा! ‘फॅमिली मॅन 3’ इव्हेंटमध्ये अभिनेत्रीचा गेला तोल आणि...; Video Viral

पैशाचा वाद आणि तक्रार

ड्रीम व्हिजन इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा, मुरादाबाद येथील रहिवासी, यांनी 19 डिसेंबर 2017 रोजी न्यायालयात लेखी तक्रार दाखल केली होती. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, अमिषाला कार्यक्रमासाठी आगाऊ मानधन देण्यात आले, मात्र तिने परफॉर्मन्स केला नाही. त्यानंतर दोघांमध्ये समझोता झाला, ज्यात अमिषाने 14 लाख परत देण्याचे मान्य केले होते. त्यातील 6 लाख रोख आणि 2 लाखांचा चेक असा हप्ता तिने दिला, परंतु तो चेक बँकेत जमा केल्यानंतर बाउन्स झाला.

हेही वाचा - Amitabh Bachchan: बिग बींची करोडोंची रिअल इस्टेट डील!; दोन आलिशान फ्लॅट्स विक्रीतून मिळाला भन्नाट नफा, किती कोटींचा फायदा झाला?

कोर्टात पुन्हा सुनावणी

चेक बाउन्स झाल्यानंतर आयोजकांनी अमिषा पटेल आणि तिच्या टीमशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने पवन वर्मा यांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली. याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने अमिषाला समन्स बजावले असून 9 जानेवारी 2026 रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री