Firing at Kapil Sharma's Kaps Cafe: कॅनडामध्ये प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झाला. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. गेल्या चार महिन्यांतील ही तिसरी घटना आहे, ज्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. ही घटना कॅनडातील सरे (Surrey) परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे काही अज्ञात हल्लेखोरांनी कॅफेवर गोळीबार केला. घटनास्थळी अर्धा डझन गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यामुळे कॅफेच्या काही काचा फुटल्या. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्यानंतर गोल्डी ढिल्लन आणि कुलदीप सिद्धू, जे बिश्नोई गँगशी संबंधित आहेत, यांनी सोशल मीडियावर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
हेही वाचा - Sonakshi Sinha Pregnant : सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? अफवांना कंटाळून पती झहीर इक्बालने पापाराझींसमोर केला 'असा' मजेशीर प्रकार
त्यांनी म्हटले की, 'आमचे सामान्य लोकांशी कोणतेही वैर नाही. ज्यांच्याशी आमचे वाद आहेत त्यांनी आमच्यापासून दूर राहावे. जे बेकायदेशीर काम करतात किंवा आमचे पैसे देत नाहीत, त्यांनी तयार राहावे.' कपिल शर्माच्या कॅफेवर पहिला हल्ला 10 जुलै, दुसरा 8 ऑगस्ट, आणि आता तिसरा ऑक्टोबरमध्ये झाला आहे. दुसऱ्या हल्ल्यात तब्बल 25 गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. प्रत्येक वेळी लॉरेन्स बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारली आहे.
हेही वाचा - Rajat Bedi Daughter : रजत बेदीच्या मुलीचा सोशल मीडियावर जलवा! पण लोकप्रियतेमुळे वाढली चिंता
पहिल्या दोन हल्ल्यांनंतर कपिल शर्माला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अतिरिक्त सुरक्षा दिली होती. कॅनडातील पोलिसांनीही या ताज्या हल्ल्याबाबत गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.