Monday, June 23, 2025 11:10:37 AM

होम मिनिस्टरला 'पैठणी' देण्यामागचा विचार कुणाचा? आदेश बांदेकरांनी सांगितला किस्सा

'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात जिंकणाऱ्या महिलेला पैठणीच का दिली जाते?', हा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

होम मिनिस्टरला पैठणी देण्यामागचा विचार कुणाचा आदेश बांदेकरांनी सांगितला किस्सा

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा तसेच विजेत्या महिलांना 'पैठणी' देणारा कार्यक्रम म्हणजे 'होम मिनिस्टर'. 'दार उघड बये दार उघड', असं म्हणत आदेश भाऊजी अनेक महिलांना प्रोत्साहन दिले. तसेच, महिलांसोबत संवाद साधत आदेश भाऊजींनी महाराष्ट्रातील तसेच देशभरातील वहिनींच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं आहे. इतकंच नाही, तर विजेत्या 'होम मिनिस्टर'ला आकर्षक पैठणी देऊन आदेश भाऊजींनी अनेक महिलांचा सम्मान केला आहे. 

महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून ओळखली जाणारी पैठणी महिलांसाठी खूप खास आहे. पैठणी हा अनेक महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या पैठणीला राज्यभरातच नाही तर संपूर्ण जगभरात ओळख देण्याचं काम 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने केले आहे. यात आदेश बांदेकरांचाही मोलाचे योगदान आहे. मात्र, अनेकांना प्रश्न पडला असेल आणि ते म्हणजे 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात जिंकणाऱ्या महिलेला पैठणीच का दिली जाते? याचा उलघडा आदेश बांदेकर यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी केला आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया. 

हेही वाचा: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू; युवासेनेचा अल्टिमेटम

मिसेस बांदेकरांनी उलगडला 'पैठणी' देण्यामागचा किस्सा:

 नुकताच, सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या कार्यक्रमात आदेश बांदेकरांची पत्नी सुचित्रा बांदेकरांनी हजेरी लावली होती. यादरम्यान, सुचित्रा यांनी  पती आदेश बांदेकर यांच्या 'होम मिनिस्टर' कार्यक्रमातील पैठणी देण्यामागचा किस्सा सांगितला. तेव्हा सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, 'ही गोष्ट खूप वर्षांपूर्वींची आहे. तेव्हा, पैठणी खरेदी करण्यासाठी आम्हा महिलांकडे फारसे पैसे नसायचे. मग आम्ही आमच्या सोसायटीमधील सर्व बायकांनी असं ठरवलं होतं की, 'पैठणी विकत घ्यायची'. तेव्हा आदेशचा 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम नव्हता. आदेशच्या या कार्यक्रमाला आता २० वर्षे झाली. त्याआधीची ही गोष्ट आहे'.

पुढे सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, 'तेव्हा सोसायटीतील सर्व महिलांनी पैसे पैठणीसाठी पैसे काढायचो. जिचा नंबर लागेल तिला ती पैठणी मिळायची. खरंतर असं अशारितीने आम्ही पैठणीची भिशी काढायचो. ही गोष्ट मी आदेशला सांगितली. तेव्हा आदेश म्हणाला, ''तुमच्यासाठी पैठणी इतकी महत्त्वाची आहे?''. जेव्हा ही गोष्ट आदेशला कळलं, तेव्हा त्याने झी मराठी या बहिणीसोबत संवाद साधला आणि त्याने ''होम मिनिस्टर'' या कार्यक्रमाची सुरुवात केली, ज्यात विजेत्या महिलांना पैठणी द्यायला सुरुवात केली. ज्या स्त्रियांसाठी पंधरा ते वीस हजाराची पैठणी घेणं कठीण असतं, त्यांच्यासाठी आदेशने हा नवा उपक्रम सुरु केला. तर पैठणी देण्याचं क्रेडिट हे पूर्णतः माझं आहे'.


सम्बन्धित सामग्री