अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेली पाहायला मिळते. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा माजी पती आदिल दुर्राणी यांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारी फेटाळून लावल्या आणि म्हटले की त्यांनी हा वाद सामंजस्याने सोडवला आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील म्हणाले, 'परस्पर संमतीने झालेल्या तोडग्यामुळे, एफआयआर प्रलंबित ठेवण्याची गरज नाही. "एफआयआर आणि त्यानंतरचा आरोपपत्र रद्द करण्यात येत आहे." न्यायालयाने म्हटले की, वैवाहिक वादांमुळे एफआयआर नोंदवण्यात आला होता.
हेही वाचा - Priya Berde News: स्टार प्रवाहवरील 'काजळमाया' मालिकेतून अभिनेत्री प्रिया बेर्डे प्रेक्षकांच्या भेटीला, तब्बल 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक
निकाल जाहीर झाला तेव्हा राखी सावंत आणि दुर्राणी दोघेही न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी न्यायालयाला सांगितले की त्यांना एफआयआर रद्द करण्यास कोणताही आक्षेप नाही. FIR रद्द होताच राखीने पहिली प्रतिक्रिया दिली असून, 'भारत माता की जय मोदी सरकार की जय... मेरे डॅडी डोनाल्ड ट्रम्प की जय ..बाय' असं राखी म्हणाली. राखी सावंतने आदिल दुर्राणींवर गुन्हेगारी धमकी, छळ आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचे आरोप केले होते. राखी सावंतने अश्लील व्हिडिओ व्हायरल करून त्यांची प्रतिमा खराब करण्याची धमकी दिल्याचा आरोप आदिलने केला होता.
हेही वाचा - Veteran Actor Pankaj Dheer : कर्करोगाशी झुंज अपयशी; अभिनेता पंकज धीर कालवश
राखी सावंतने 2022 मध्ये इस्लामिक पद्धतीने आदिल दुर्राणीशी लग्न केले. फेब्रुवारी 2023 मध्ये या जोडप्याने वेगळे होण्याची घोषणा केली आणि त्यानंतर एकमेकांविरुद्ध एफआयआर दाखल केले.