Monday, November 17, 2025 12:00:47 AM

Sonakshi Sinha On Pregnancy : 'गर्भधारणेचा जागतिक विक्रम...', गरोदरपणाच्या चर्चांवर सोनाक्षी सिन्हाने अखेर दिलं उत्तर

नुकत्याच पसरलेल्या गर्भधारणेच्या अफवांवर तिने दिलेले मजेशीर उत्तर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

sonakshi sinha on pregnancy   गर्भधारणेचा जागतिक विक्रम गरोदरपणाच्या चर्चांवर सोनाक्षी सिन्हाने अखेर दिलं उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच दिवाळी पार्टीला उपस्थित राहिली होती, ज्यामुळे तिच्या गरोदरपणाबद्दल चर्चा सुरू झाली होती. लग्नापासून ही चर्चा सुरू असतानाच, अलिकडेच तिने सैल कपड्यांमध्ये दिसल्याने पुन्हा एकदा  उधाण आले आहे.

या पार्टीसाठी सोनेरी आणि ऑफ-व्हाइट रंगाच्या सुंदर पोशाखात सोनाक्षी दिसली. तिचा हा लूक पाहून अनेक नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू केल्या. तिच्या व्हिडिओवर आधारित या अफवा सुरू असतानाच, झहीरने पापाराझींसमोर असे काही केले की सगळे चकित झाले. खुद्द सोनाक्षीही काही क्षणांसाठी गोंधळात पडली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

हेही वाचा - Rajat Bedi Daughter : रजत बेदीच्या मुलीचा सोशल मीडियावर जलवा! पण लोकप्रियतेमुळे वाढली चिंता 

अशातच आता सोनाक्षीने गरोदरपणाच्या अफवांवर मजेशीर उत्तर दिले आहे. सोनाक्षीने फोटो शेअर करत लिहिले की, "मानवी इतिहासातील सर्वात जास्त काळ गर्भधारणेचा जागतिक विक्रम (आमच्या सुंदर आणि अति बुद्धिमान माध्यमांनुसार 16 महिने आणि त्यानंतर) फक्त मध्यभागी हात ठेवून पोज दिल्याबद्दल. आमच्या प्रतिक्रियेसाठी शेवटच्या स्लाइडवर स्क्रोल करा... आणि नंतर या दिवाळीचा आनंद घ्या". दरम्याने सोनाक्षीच्या उत्तराने सर्वांचीच बोलती बंद झालेली दिसून येत आहे. 

हेही वाचा - Sonakshi Sinha Pregnant : सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? अफवांना कंटाळून पती झहीर इक्बालने पापाराझींसमोर केला 'असा' मजेशीर प्रकार 

नेमकं काय घडलं? 
रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला हे दोघे पोहोचले असताना, झहीरने कॅमेऱ्यासमोर अचानक सोनाक्षीच्या पोटाला स्पर्श केला आणि तिचा बेबी बंप लपवण्याचा अभिनय केला. हे पाहून सोनाक्षीने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिले, तेव्हा दोघेही हसले. झहीरने पुन्हा एकदा हा प्रयत्न केला तेव्हा सोनाक्षीने त्याला प्रेमाने थांबवले. अखेरीस, झहीर हसत म्हणाला की या सर्व केवळ अफवा आहेत.


सम्बन्धित सामग्री