Saturday, November 15, 2025 02:50:39 PM

'या' कलाकारांनी केले मतदान

मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

या कलाकारांनी केले मतदान

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून सुरूवात झाली आहे. राजकीय मंडळींपासून ते सेलेब्रिटींपर्यंत सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान केले आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार याने सकाळी मतदान केले आहे. बॉलीवूड अभिनेता अली फ़ज़लने मतदानाचा हक्क बजावला आहे. फ़रहान अख्तरने देखील मतदान केले आहे. 
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणून ओळख असणारे रितेश देशमुख आणि जेनेलिया देखमुख यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकुर्णीने सहकुटुंब मतदान केले आहे. प्राजक्ता माळीने देखील मतदान करत कंटाळा न करता मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तेजस्विनी पंडितनेदेखील तिचा मतदाना हक्क बजावला आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेसह अभिनेत्री सुकन्या मोने, सायली संजीव यांनी मतदान केले आहे. 

मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचबरोबर त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री