सध्या सर्वत्र 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचा दमदार टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रितेश देशमुखसह अनेक बडे कलाकार या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहेत. राजा शिवाजी सिनेमात रितेश देशमुख छत्रपती शिवरायांची भूमिका साकारत आहे. तसेच रितेश या सिनेमाचा लेखक, निर्माता असून दिग्दर्शनही केले आहे. सिनेमाची भव्यता लक्षात घेता निर्मितीसाठी 100 कोटींपेक्षा अधिक खर्च झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रितेश देशमुखसह त्याची पत्नी जिनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन , विद्या बालन, सलमान खान, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे. पण या कलाकारांना किती मानधन मिळालं यासंदर्भात सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
रितेश देशमुख
समोर आलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीनुसार, रितेश देशमुखने त्याच्या भूमिकेसाठी 15 कोटी ते 18 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे. यामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसत आहे.
अभिषेक बच्चन
या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी शहाजी भोसले यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
जिनिलिया देशमुख
या चित्रपटामध्ये जिनिलिया ही महाराजांच्या पत्नी, सईबाई यांची भूमिका साकारत आहे. यासाठी जिनेलियाला 1 कोटी ते 2 कोटी रुपयांचे मानधन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ती या चित्रपटाची निर्मातीदेखील आहे.
संजय दत्त
या चित्रपटात संजय दत्त अफझल खानाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याला 8 ते 10 कोटी मानधन मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे.
फरदीन खान
फरदीन खान हा शाहजहाँच्या भूमिकेत दिसणार असून, त्यालाही 2 ते 3 कोटी रुपये मानधन मिळाले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
महेश मांजरेकर
महेश मांजरेकर राजा शिवाजी या सिनेमात लखुजी जाधव यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या भूमिकेसाठी त्यांना 2 ते 3 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
विद्या बालन
विद्या बालन ही राजा शिवाजी या चित्रपटामध्ये 'ताजुल मुखिदरात' या भूमिकेत दिसणार आहे. तिला 1.5 कोटी रुपये मानधन मिळाल्याचे बोलले जाते.