Monday, November 17, 2025 12:50:13 AM

Shirish Gavas : 'Red Soil Stories' फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शिरीष गवसच्या मृत्यूचे खरं कारण आलं समोर

शिरीषचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाले ? याबद्दल त्याच्या पत्नीने सांगितले आहे.

shirish gavas  red soil stories फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शिरीष गवसच्या मृत्यूचे खरं कारण आलं समोर

 मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि  रेड सॉईल स्टोरीज युट्युब चॅनलचा निर्माता शिरीष गवसचा वयाच्या 33 व्या वर्षी निधन झाले. त्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. खूप कमी वयात त्याचे निधन झाले मात्र त्याने केलेले व्हिडीओ आजही आवडीने पाहिले जातात. अशातच आता त्याच्या मृत्यूबद्दलची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरीषचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाले ? याबद्दल त्याच्या पत्नीने सांगितले आहे. 

शिरीषची पत्नी पूजाने सांगितले कि, मार्च महिन्यामध्ये शिरीषला सर्दी झाली होती. त्याचवेळी त्याचे डोकंदेखील सातत्याने दुखायचे. त्याला सायनस झाल्याचे निदान त्यावेळी झाले. नंतर काही टेस्ट केल्या असता त्याच्या किडनीमध्ये ११ MM चा स्टोन असल्याचे दिसून आले. त्यावर त्याची शस्त्रक्रिया झाली. यावेळी सर्जरीमध्ये स्टेन घातलेली काढण्यासाठी त्याला डॉक्टरांनी बोलावलं. मात्र त्याच्या निधनाच्या 15 दिवस आधीपासूनच त्याला उलट्या होण्यास सुरुवात झाली आणि त्यामध्येच त्याची तब्येत खूप बिघडली. त्याचवेळी त्याला फिट आली. त्याला रुग्णालयात लगेचच दाखल केले. 

हेही वाचा - Chhaya Kadam : आयफा हुकला, पण फिल्मफेअर जिंकलाच! छाया कदम 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री'; माधुरी दीक्षितला मागे टाकत पटकावला मानाचा पुरस्कार 

शिरिषच्या फीट्सचा त्रास वाढला आणि तो बेशुद्ध झाला. टेस्टच्या रिपोर्ट्सनुसार शिरिषच्या मेंदूमध्ये गाठ आहे आणि त्यात पाणी भरलेलं असल्याचं मेंदूच्या डॉक्टरांनी सांगितलं. अवघ्या दोन-तीन तासांमध्येच शिरिष कोमामध्ये गेला होता. त्याची परिस्थिती पाहता डॉक्टरांनी त्याला लगेचच ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्याच्या मेंदूत जमलेले पाणी काढण्यास सुरुवात केली. 

हेही वाचा - Abhishek Bachchan: अभिषेकला मिळाला बेस्ट एक्टर फिल्मफेअर अवॉर्ड, सोहळ्यात पत्नी ऐश्वर्याच्या अनुपस्थितीने चर्चांणा उधाण 

सहा तासांच्या सर्जरीनंतर त्याच्या मेंदूतून रक्ताच्या गाठी काढण्यात आल्या. दोन दिवसांनी शिरिष शुद्धीवर आला. तीन-चार दिवसांनी त्याची प्रकृती सुधारल्यावर ट्यूमरचं ऑपरेशन करायचं ठरलं. यात खूप रिस्क होती. सात-आठ तासांच्या सर्जरीनंतर शिरिषच्या मेंदूमधील ट्यूमर काही अंशी काढण्यात डॉक्टरांना यश आले. पण हा ट्यूमर मेंदूच्या अत्यंत नाजूक भागात होता. तो पूर्णपणे काढता येणं शक्य नव्हतं. यात जराही धक्का बसला असता तर शिरिषच्या जीवाला धोका होता. डॉक्टरांना केवळ 20 टक्के भाग काढता आला. कारण सर्जरीमध्ये जरा धक्का बसला असता तर शिरिषला मेमरी लॉस, चालण्या-बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम इत्यादी समस्या जाणवल्या असत्या. ट्यूमर पूर्ण न काढता आल्यामुळे तो पुन्हा कधीही वाढू शकतो ही भीती होती.

अचानक ४-५ दिवसांनी त्याला ताप येऊ लागला. त्यानंतर लगेचच अनेक टेस्ट्स केल्या. तर त्याच्या लघवीमध्ये आणि मेंदूच्या पाण्यामध्ये इन्फेक्शन झाल्याचं समजलं. त्यानंतर त्याला पुन्हा आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं.अंथरुणाला खिळून राहणं शिरीषच्या नशिबात नव्हतं, म्हणूनच तो हसत खेळत आमच्यातून निघून गेला. असं शेवटी पूजा म्हणाली. 


सम्बन्धित सामग्री