Rashmika-Vijay Deverakonda: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावर या जोडीच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे कार्ड लीक झाले असून ते तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारी 2016 रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नाचे ठिकाण अद्याप गुलदस्त्यात असले तरी, उदयपूरमधील एका आलिशान पॅलेसमध्ये हा सोहळा पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खाजगी विवाह सोहळा आणि 'उदयपूर' कनेक्शन
विजय आणि रश्मिका यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात होते. लीक झालेल्या आमंत्रण पत्रिकेनुसार, 26 फेब्रुवारी रोजी अत्यंत खाजगी स्वरूपात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या सोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि मोजकेच जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. लग्नासाठी राजस्थानमधील उदयपूर किंवा हैदराबादमधील बंजारा हिल्स या दोन ठिकाणांची चर्चा रंगली असून, दोन्ही सेलिब्रिटींनी यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही.
3 मार्च रोजी हैदराबादमध्ये ग्रँड रिसेप्शन
लग्नानंतर सिनेसृष्टीतील मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांसाठी 3 मार्च रोजी हैदराबादमध्ये एका भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्डवरील माहितीनुसार, हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे, रश्मिका आणि विजय यांनी ऑक्टोबर 2015 मध्येच गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यांच्या बोटांमधील लग्नाच्या अंगठ्या आणि अलीकडेच एका पार्टीत विजयने रश्मिकाच्या हाताचे चुंबन घेतल्याचा व्हायरल व्हिडिओ, या सर्व गोष्टी त्यांच्या नात्याची साक्ष देत आहेत.
'गीता गोविंदम' ते लग्नापर्यंतचा प्रवास
रश्मिका आणि विजय यांची प्रेमकहाणी 2018 मध्ये 'गीता गोविंदम' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली आणि ही जोडी रिअल लाईफमध्येही एकत्र यावी अशी इच्छा व्यक्त केली जात होती. त्यानंतर 'डियर कॉम्रेड'मध्येही त्यांनी एकत्र काम केले. अनेकदा सुट्ट्यांच्या काळात एकाच ठिकाणचे फोटो शेअर करून त्यांनी आपल्या नात्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले होते.
हेही वाचा - Yashwantrao Chavan Award Jayesh Mestri : मराठी लेखनाला मोठा सन्मान! जयेश मेस्त्री यांना महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर
रश्मिका मंदानाचे हे दुसरं मोठे नातं आहे. यापूर्वी 2016 मध्ये 'किरीक पार्टी' चित्रपटादरम्यान ती अभिनेता-दिग्दर्शक रक्षित शेट्टीच्या प्रेमात पडली होती. 2017 मध्ये त्यांचा साखरपुडाही झाला होता, मात्र वैयक्तिक कारणांमुळे 2018 मध्ये त्यांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विजय देवरकोंडा रश्मिकाच्या आयुष्यात आला आणि आता ही जोडी अधिकृतपणे पती-पत्नी म्हणून नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे.