Saturday, June 14, 2025 03:51:47 AM

पाकिस्तानी गाण्यावर नाचल्याने कंगनावर टीका

अभिनेत्री कंगना रानौतने जयपूर दौऱ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये कंगना मोरासोबत नाचताना दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती झाडावरून आंबे तोडताना दिसत आहे.

पाकिस्तानी गाण्यावर नाचल्याने कंगनावर टीका

जयपूर: मंडी येथील खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत सतत चर्चेत असते. नुकताच, अभिनेत्री आणि मंडीची खासदार कंगना रानौत एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तसेच, तिला ट्रोल देखील केले जात आहे. आता तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडला असेल की कंगना रानौत नेमकी कोणत्या कारणामुळे ट्रोल होत आहे? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

नुकताच, खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत जयपूरमध्ये आहे. अशातच, तिने जयपूर दौऱ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये कंगना मोरासोबत नाचताना दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती झाडावरून आंबे तोडताना दिसत आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी गाणे वापरल्यामुळे कंगनाला ट्रोल केले जात आहे. या व्हिडिओमध्ये कंगनाने पाकिस्तानी गाण्याचा वापर केल्यामुळे अनेकांनी तिला देशद्रोही म्हटले आहे.

हेही वाचा: सुन ले बेटा पाकिस्तान, बाप हैं तेरा हिंदुस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी पाकला सुनावलं

पाकिस्तानी गाणं वापरणं कंगणाला महाग पडलं:

कंगनाने तिच्या सोशल मीडियावर पाकिस्तानी कलाकार जैन आणि जोहैब यांनी बनवलेले गाणे वापरले आहे. एकीकडे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे कंगनाने पाकिस्तानी गाणे वापरल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. कंगनाच्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत म्हटले, 'देशद्रोही पाकिस्तानी गाणे', 'हे पाकिस्तानी गाणे आहे दीदी', 'तू पाकिस्तानी गाणे का वाजवले आहेस?', 'ती पाकिस्तानचा इतका द्वेष करते मग पार्श्वभूमीत पाकिस्तानी गाणे का आहे?' असं तिला ट्रोल करत आहेत.

कंगनाचा व्हायरल व्हिडिओ:

या व्हिडिओमध्ये कंगना मोरासोबत नाचताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती झाडावरून आंबे पटकन तोडताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'जिवंत राहण्यासाठी फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे जीवन. आशा आहे की आपण फक्त जगत नाही तर जिवंत आणि उत्साही देखील आहोत'.


सम्बन्धित सामग्री