Sunday, November 16, 2025 11:09:23 PM

'नटरंग'नंतर रवी जाधवांची 'The Folk Akhyan' बरोबर नवीन कलाकृती' लवकरच

चित्रपटाची कथा, गाणी, कलाकारांचा अभिनय यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडला होता. दिग्दर्शक रवी जाधव एक नवा कोरा तमाशापट घेऊन येत आहेत.

नटरंगनंतर रवी जाधवांची  the folk akhyan बरोबर नवीन कलाकृती लवकरच

मराठी मनोरंजन क्षेत्रात दिग्दर्शक रवी जाधव यांचा 'नटरंग' हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. या कलाकृतीला खूप पसंती मिळाली आहे. 'नटरंग' ही झी स्टुडिओजची पहिलीच निर्मिती होती. चित्रपटाची कथा, गाणी, कलाकारांचा अभिनय यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडला होता. दिग्दर्शक रवी जाधव एक नवा कोरा तमाशापट घेऊन येत आहेत. 

'फुलवरा' या चित्रपटाची  दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर या अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेपासूनच चित्रपटाबद्दल कमालीचं उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्याने 'फुलवरा'बद्दल भाष्यदेखील केले आहे. ते म्हणाले की, "तमाशा लोकप्रकार मला खूप आवडतो. फडावर कलावंत आपली कला सादर करत असतात. मात्र रंजक फडाच्या मागचं त्यांचं आयुष्य असतं आणि हेच आयुष्य मला कायम अस्वस्थ करतं". 

हेही वाचा - KBC 17 Ishit Bhatt: कौन बनेगा करोडपती 17 ज्युनियर मधील उद्धट वागण्यानंतर इशित भट्टची माफी; म्हणाला.....

पुढे ते म्हणाले की, "पुन्हा मला तमाशावर आधारित चित्रपट करायचा आहे. याचदरम्यान मी 'द फोक आख्यान' हा एक  लोककलाविष्कार बघितला आणि त्या सादरीकरणाने मी भारावून गेलो. सध्याची ही तरुण पिढी ज्या आत्मियतेने आणि तळमळीने आपली लोककला, परंपरा प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचं काम करत आहेत ते वाखणण्याजोगं आहे". 

हेही वाचा - Actor Asrani Passes Away: ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते गोवर्धन असरानी यांचे निधन; 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

नंतर ते म्हणाले की, "'द फोक आख्यान'च्या तरूणांची लोककला जपण्याची तळमळ पाहूनच हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडावा असे माझ्या डोक्यात आली आणि नंतरच 'फुलवरा'ची कथा तयार झाली. 'द फोक आख्यान'चा लेखक इश्वर अंधारेचा लोककलेचा अभ्यास थक्क करणारा आहे. त्यामुळे हा चित्रपट करण्यास खूपच उत्सुक आहे", असं रवी जाधव म्हणाले. 


सम्बन्धित सामग्री