Friday, December 05, 2025 01:26:15 AM

चाहत्यांसाठी खुशखबर! दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' आता OTT वर होणार रिलीज; 'या' तारखेपासून चाहत्यांच्या भेटीला

सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित असलेला 'दशावतार' सिनेमा 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली.

चाहत्यांसाठी खुशखबर दिलीप प्रभावळकरांचा दशावतार आता ott वर होणार रिलीज या तारखेपासून चाहत्यांच्या भेटीला

Dilip Prabhavalkar’s Dashavatar OTT Release : प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा आणि 2025 या वर्षातील गाजलेल्या सिनेमांपैकी एक असलेला 'दशावतार' आता ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर दाखल होत आहे. ज्या प्रेक्षकांना काही कारणास्तव चित्रपटगृहांमध्ये या सिनेमाचा अनुभव घेता आला नाही, त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. हा कोकणातील पारंपरिक लोककला आणि हृदयस्पर्शी कथा असलेला सिनेमा लवकरच डिजिटल माध्यमावर प्रदर्शित होणार आहे.

कधी आणि कुठे पाहता येणार?
दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला 'दशावतार' सिनेमा 14 नोव्हेंबर पासून झी-5 (Zee5) या ओटीटी माध्यमावर पाहता येणार आहे. 'झी-5' च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
झी-5 ची घोषणा: "एक 80 वर्षांचा कलाकार, ज्याच्या आयुष्याच्या रंगमंचावर उभा राहिला दशावतार. पाहायला विसरू नका मराठीतील भव्य-दिव्य सिनेमा 'दशावतार'. 14 नोव्हेंबरपासून फक्त झी-5 वर", अशा शब्दांत या सिनेमाच्या ओटीटी रिलीजची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा - The Family Man Season 3 Trailer Launch: ट्रेलर लॉंचमध्ये फॉल मोव्हमेन्टची चर्चा! ‘फॅमिली मॅन 3’ इव्हेंटमध्ये अभिनेत्रीचा गेला तोल आणि...; Video Viral

जगभरात गाजलेला 'बाबुली मेस्त्री'चा खेळ
सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित असलेला 'दशावतार' सिनेमा 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली. सिनेमातून मांडण्यात आलेला विषय अनेकांना भावला आणि रसिकांनी कोकणातील 'बाबुली मेस्त्री'ची ही गोष्ट अक्षरशः डोक्यावर घेतली.
कलेचा संगम: या सिनेमातून वडील-मुलाच्या प्रेमळ नात्याबरोबरच कोकणातील पारंपरिक लोककला 'दशावतार' प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.
दिग्गजांकडून कौतुक: या सिनेमाचे प्रेक्षकांसह राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांकडून कौतुक झाले आहे. 'कांतारा'चा (Kantara) दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने देखील 'दशावतार'बद्दल आपली सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

दिलीप प्रभावळकरांव्यतिरिक्त या सिनेमात महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, आरती वडगबाळकर आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते. त्यांच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले.

हेही वाचा - Amitabh Bachchan: बिग बींची करोडोंची रिअल इस्टेट डील!; दोन आलिशान फ्लॅट्स विक्रीतून मिळाला भन्नाट नफा, किती कोटींचा फायदा झाला?


सम्बन्धित सामग्री