मुंबई: श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक स्थापनेनंतर अयोध्येतील राम जन्मभूमी परिसरात चित्रीत झालेला 'मिशन अयोध्या' हा भारतातील पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मराठी चित्रपटात रामलल्ला मूर्तीचे दर्शन, चंद्राच्या प्रकाशात झळाळणारी मूर्ती, भक्तांच्या हृदयात श्रद्धा जागवणारे रामलल्लाचे हास्य आणि करुण डोळे यांचा सुंदर आविष्कार प्रेक्षकांना या चित्रपटातून अनुभवता येणार आहे.
दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन'च्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव अत्यंत प्रेरणादायी होता, असे दिग्दर्शक सुर्वे यांनी सांगितले. अयोध्येतील भक्तांच्या गजबजाटात आणि मंदिराच्या शांततेत चित्रीकरण करताना प्रत्येक क्षण खास होता.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटले की, 'मिशन अयोध्या' रामभक्ती, श्रद्धा आणि सामाजिक मूल्यांचा संगम असून, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रामभक्तीची ज्योत कायम ठेवेल. हा चित्रपट २३ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.