बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा बहुचर्चित ‘मालिक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा फुल्ल ऑन एक्शनने भरलेला ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात राजकुमार पहिल्यांदाच एका गँगस्टरच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. राजकुमार यानं अनेक चित्रपटांमध्ये लव्हर बॉय आणि मध्यमवर्गीय माणसाच्या भूमिका साकरलेल्या आहेत. आता तो गँगस्टरच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलरची सुरुवात जोरदार पोलिस फोर्स आणि धमाकेदार डायलॉगने होत आहे. त्यानंतर राजकुमार राव बंदूक खांद्यावर घेतलेल्या थरारक अॅक्शनसह समोर येताना पहायला मिळत आहे. 2 मिनिटं 45 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये एक सामान्य माणूस कसा गँगस्टर बनतो आणि राजकारणात प्रवेश करून आमदार होण्याचा प्रयत्न करतो, हे दाखवण्यात आलंय.
हुमा कुरैशीचं आयटम साँग
मालिक चित्रपटात मानुषी छिल्लर राजकुमारच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. सौरभ शुक्ला, स्वानंद किरकिरे आणि अंशुमान पुष्कर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये हुमा कुरैशीच्या आयटम साँगची झलकही पहायला मिळत आहे.