Thursday, March 12, 2026 10:46:56 PM

Rajpal Yadav Bail : राजपाल यादव यांना अंतरिम जामीन मंजूर; तुरुंगाबाहेर येताच पहिली प्रतिक्रिया समोर

राजपाल यादव अखेर तुरुंगातून बाहेर आला असून त्याच्या आयुष्यातील एका अत्यंत तणावपूर्ण प्रकरणाचा शेवट झाला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर राजपाल यादवने सार्वजनिकरित्या आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

rajpal yadav bail  राजपाल यादव यांना अंतरिम जामीन मंजूर तुरुंगाबाहेर येताच पहिली प्रतिक्रिया समोर

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव अखेर तुरुंगातून बाहेर आला असून त्याच्या आयुष्यातील एका अत्यंत तणावपूर्ण प्रकरणाचा शेवट झाला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर राजपाल यादवने सार्वजनिकरित्या आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी राजपाल यादव म्हणाले की, "कोणतीही कायदेशीर माहिती हवी असेल तर तुम्ही माझे वकील भास्कर उपाध्याय यांना विचारून त्यांच्यकडून घेऊ शकता. बाकी मी म्हणायचं झालं तर एवढचं बोलू शकतो की, मला 27 मध्ये बॉलिवूडमध्ये राहून 30 वर्षे पूर्ण होतील... संपूर्ण देशातील लहान लहान मुल माझ्यासोबत आहेत म्हणून मी आजवर 250 चित्रपट करू शकलो...  हा किस्सा 2012-13 ला सुरु झाला होता. त्यानंतर आता 2026 पर्यंत मी 250 चित्रपट केले आहेत. भारतीय सिनेमातील लहान मुल, वरिष्ठ आणि तरुण पिढी माझ्या हृदयाचा तुकडा आहेत. मी सत्याच्या बाजूने आहे, त्यामुळे उच्च न्यायालयाने मला या 10 वर्षात जिथे-जिथे उपस्थित राहण्याचे आदेश दिले मी तिथे-तिथे उपस्थित राहिलो आहे, आणि यापुढे ही राहिन..."

तुरुंगातून सुटल्यानंतर राजपालने आपल्या निवेदनाद्वारे सलमान खानच्या मैत्रीचे गोडवे गात चाहत्यांचेही आभार मानले आहेत. कायदेशीर लढाई संपल्यानंतर आता तो पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय होण्याची आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची आशा व्यक्त करत आहे. बॉलिवूडमधील मित्र कठीण काळात कसे खंबीरपणे पाठीशी उभे राहतात, याचे हे एक जिवंत उदाहरण मानले जात आहे.

हेही वाचा- Prasika Influencer Couple: लोकप्रिय इन्फ्लुएन्सर ‘प्रसिका’चे अकाऊंट अचानक सस्पेंड; प्रसाद वेदपाठकने पोस्ट करत म्हटलं, 'आम्हाला काही झालं तर जबाबदार...'
नेमकं प्रकरण काय?
राजपाल यादवच्या कायदेशीर अडचणींची सुरुवात 2010 च्या सुमारास झाली होती. त्याने आपल्या एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. दुर्दैवाने, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि राजपालची आर्थिक गणिते कोलमडली. त्याने दिलेले अनेक धनादेश (Check) न वटल्याने कर्जदाराने कायदेशीर कारवाई केली. व्याजासह ही थकबाकी तब्बल 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने वारंवार मुदत देऊनही कर्जफेड न झाल्याने, राजपालला फेब्रुवारी 2026 च्या सुरुवातीला आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले होते.


सम्बन्धित सामग्री