Ramayana Movie Cast Fees : मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात भव्य दिव्य चित्रपट ‘रामायण’चा पहिला टीझर ३ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट दोन भागात रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भगवान राम, माता सीता व रावणाच्या भूमिकांसाठी निवडलेले कलाकार आणि त्यांना मिळणारे मानधन सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कोणाला किती मानधन दिलं जाणार आहे हे आपण या लेखातून पाहुयात.
रणबीर कपूरला १५० कोटींचं मानधन
रामायण चित्रपटात भगवान रामाची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारत आहे. त्याला या चित्रपटाच्या प्रत्येक भागासाठी ७५ कोटी रुपये मानधन दिलं जाणार आहे. त्यामुळं दोन्ही भागांसाठी रणबीरला एकूण १५० कोटी रुपये मिळणार आहेत. रणबीर कपूर पूर्वी एका चित्रपटासाठी ५० कोटी रुपये घेत होता. पण रामायण चित्रपटातून त्याला मोठं मानधन मिळणार आहे.
हेही वाचा - भारतात पुन्हा एकदा पाकिस्तानी स्टार्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर बंदी
साई पल्लवीला १२ कोटींचं मानधन
चित्रपटात माता सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे. तिला प्रत्येक भागासाठी ६ कोटी रुपये मानधन मिळणार आहे. त्यामुळं दोन्ही भागांमधून तिला एकूण १२ कोटी रुपये मिळतील. याआधी साई पल्लवी एका चित्रपटासाठी २.५ ते ३ कोटी रुपये घेत होती.
हेही वाचा - आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा
रावणाच्या भूमिकेत यश
केजीएफ फेम अभिनेता यश रामायणमध्ये रावणाची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या मानधनाबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही त्याला मोठं मानधन देण्यात आलं असल्याचं वृत्त आहे.
रामायणचं बजेट तब्बल १६०० कोटी
मेन्सएक्सपीच्या माहितीनुसार, रामायणचा पहिला भाग सुमारे ९०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होणार आहे. तर दुसऱ्या भागासाठी अंदाजे ७०० कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे रामायणचं बजेट तब्बल १६०० कोटी रुपयांवर जाईल आणि ही भारतातील सर्वाधिक महागडा चित्रपट ठरणार आहे.
रिलीज डेट जाहीर
रामायणचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेता सनी देओल याची निवड करण्यात आली आहे.