मुंबई: 1997 मध्ये सुरू झालेल्या शक्तिमान या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य केले होते. या मालिकेत शक्तिमान यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या अभिनयाला प्रेक्षक आजही विसरले नाही. 1997 मध्ये सुरू झालेली शक्तिमान ही मालिका 2005 मध्ये संपली. ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी साकारलेली शक्तिमान ही भूमिका आजही अजरामर आहे.
मात्र, गेल्या काही काळापासून 'शक्तिमान' हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सर्वत्र होत होती. मागील काही दिवसांपासून 'शक्तिमान' ची भूमिका रणवीर सिंग साकारणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र, आता अशी माहिती समोर येत आहे की 'शक्तिमान' ची भूमिका रणवीर सिंग साकारणार नाही. त्यामुळे, कोणता अभिनेता 'शक्तिमान'ची भूमिका साकारणार आहे? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचे नाव पुढे येत आहे. यावर, चित्रपटाच्या निर्मात्यांनीच मोठी अपडेट दिली आहे.
अल्लू अर्जुन साकारणार 'शक्तिमान'ची भूमिका?
काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की सोनी पिक्चर्सच्या 'शक्तिमान' चित्रपटात रणवीर सिंगऐवजी अल्लू अर्जुनला कास्ट करण्यात आले आहे. या बातमीने अभिनेत्याचे चाहते खूप खूश झाले होते. शक्तिमान चित्रपटाचे दिग्दर्शक बेसिल जोसेफ म्हणतात की, 'त्यांचा चित्रपट रणवीर सिंगशिवाय बनू शकत नाही'.
बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, 'शक्तिमान चित्रपटात इतर कोणताही अभिनेता काम करत नाही. रणवीर सिंगशिवाय दुसरा कोणीही या चित्रपटाशी संबंधित नाही. जो कोणी या कास्टिंगच्या अफवा पसरवत आहे, त्याचा स्वतःचा अजेंडा आहे. शक्तिमान चित्रपट फक्त आणि फक्त रणवीर सिंगसोबत बनवला जाईल'.
हेही वाचा: 'औरंगजेब खूप पवित्र व्यक्ती'; माजी आमदार आसिफ शेख यांचां वादग्रस्त दावा
'रणवीर शक्तीमान बनू इच्छित नाही' - मुकेश खन्ना
'शक्तिमान' हे एक असे पात्र आहे जे आजही 90 च्या दशकातील मुलांच्या हृदयात आहे. या आयकॉनिक सुपरहिरोची भूमिका अभिनेता मुकेश खन्ना यांनी केली होती. त्यांनी या हिट पात्राबद्दल अनेक प्रसंगी बोलले आहे. मुकेश खन्ना म्हणतात की, 'त्यांना रणवीर सिंगला 'शक्तिमान'ची भूमिका करताना पहायचे नाही. मात्र, त्यांना वाटते की अल्लू अर्जुनमध्ये शक्तिमान बनण्याची क्षमता आहे.
2022 मध्ये सोनी पिक्चर्सने 'शक्तिमान' ही टीव्ही मालिका चित्रपटाच्या स्वरूपात बनवण्याची घोषणा केली होती. निर्मात्यांनी त्याचा अधिकृत व्हिडिओ टीझर देखील प्रदर्शित केलं होतं. चित्रपटाची घोषणा होऊन तीन वर्षे झाली आहेत. पण आतापर्यंत चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत कोणतीही अपडेट मिळालेली नाही. आता चाहते 'शक्तिमान' हा चित्रपट लवकरात लवकर बनवावा अशी आशा करत आहेत.