मुंबई : रंग माझा वेगळा फेम रेश्मा शिंदे सोशल मिडियावर सक्रिय असते. ती वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील गोष्टी प्रेक्षकांशी शेअर करत असते. नुकतच तिने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये तिच्या हातावर मेहंदी काढलेली दिसत आहे. या पोस्टला रेश्माने माझी मेहंदी असं कॅप्शन दिले आहे.
रेश्मा शिंदेने तिच्या मेहंदीची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मेहंदी कलरचा स्लीवलेस गाऊन घातला आहे. या पोस्टमध्ये आनंदी असलेली पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांच्या पोस्टमधून रेश्मा शिंदेचे लग्न ठरले असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी तिच्या केळवणाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हा पहिल्यांदा रेश्माच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची बातमी समजली. रंग माझा वेगळा मालिकेतील अभिनेते आणि अभिनेत्री यांनी दिपा म्हणजे सगळ्यांची लाडकी रेश्मा शिंदे हिला केळवणासाठी आमंत्रित केले होते. या केळवणावेळी सगळ्यांनी तिला मौजमज्जा केल्याचे पाहायला मिळाले.
कोण आहे रेश्मा शिंदे ?
रेश्मा शिंदे हिने 2009 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. 2019 मध्ये आलेल्या रंग माझा वेगळा या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. तिच्या दिपा या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. सध्या ती स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. जानकी रणदिवे या भूमिकेवरही लोक खूप प्रेम करताना पाहायला मिळत आहेत. बंध रेशमाचे, विवाह बंधन, लगोरी, नांदा सौख्य भरे, चाहूल, केसरी नंदन, रंग माझा वेगळा या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. त्याचबरोबर जन्या, लालबागची राणी, रंग हे प्रेमाचे रंगीले, देवा- एक अतरंगी या चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.