मुंबई : मुंबईत अंधेरीतील चित्रपट निर्मात्यांच्या घरी चोरी झाली आहे. ही चोरी निर्माता स्वप्नील वाघमारे जोशी यांच्या आंबोली येथील घरात झाली. ड्रेनेज पाईपने चढून चोराने घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर चोराने पाकिटातील सहा हजार रूपये चोरी केले. एक चोरी केल्यानंतर घरात अजून काही चोरण्याच्या प्रयत्नात असताना मांजरीने ओरडून घरातील सर्वांना जागे केले. त्यानंतर घरातील सर्व लोक जागे झाले. घरातील मंडळींनी चोराचा पाठलाग केला. चोर खिडकीतून उडी मारून पळून गेला. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली. चोरी करणाऱ्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेवटी आंबोली पोलिसांनी चोराला अटक केली.