Wednesday, July 09, 2025 09:30:58 PM

संजय कपूर यांनी मृत्यूच्या काही तास आधी अहमदाबाद विमान अपघातावर केली होती पोस्ट; काय म्हटलं होत? जाणून घ्या

संजय कपूरने त्याच्या मृत्यूच्या काही तास आधी अहमदाबाद विमान अपघातावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये संजयने दुःख व्यक्त केले होते.

संजय कपूर यांनी मृत्यूच्या काही तास आधी अहमदाबाद विमान अपघातावर केली होती पोस्ट काय म्हटलं होत जाणून घ्या
Sanjay Kapoor
Edited Image

Sunjay Kapur Post On Ahmedabad Plane Crash: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूरचे निधन झाले आहे. 12 जून रोजी पोलो खेळत असताना संजय कपूरला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले. संजय कपूरने त्याच्या मृत्यूच्या काही तास आधी अहमदाबाद विमान अपघातावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये संजयने दुःख व्यक्त केले होते. संजय कपूर यांनी त्याच्या त्याच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं होतं? ते जाणून घेऊयात. 

संजय कपूर यांची अहमदाबाद विमान अपघातावर पोस्ट - 

संजय कपूरने 12 जून रोजी संध्याकाळी 5:11 वाजता त्याच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये संजयने गुजरातमधील अहमदाबाद विमान अपघातावर शोक व्यक्त केला आणि लिहिले की, 'अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची दुःखद बातमी समजली. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत. देव त्यांना या कठीण काळात शक्ती देवो.' 

हेही वाचा - करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 53 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, संजय कपूर यांनी काही तासांपूर्वी विमान अपघातातील पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना केली होती. परंतु त्यांना त्यांना कल्पनाही नसेल की, जो लोकांसाठी प्रार्थना करत आहे तो काही तासांनंतर स्वतः या जगाचा कायमचा निरोप घेणार आहे. संजय कपूर यांच्या निधनाने त्यांचे चाहते आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 

हेही वाचा - विक्रांत मेस्सीच्या भावाचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू, अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट

संजय कपूर यांच्या या पोस्टवर वापरकर्त्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने संजयच्या पोस्टवर लिहिले की, सध्या जीवनावर विश्वास नाही. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, अजूनही विश्वास बसत नाही की, तुम्ही हे जग सोडून गेला आहात. दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, आज खरोखर खूप वाईट दिवस आहे. अशा प्रकारे प्रत्येकजण संजयच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करत आहे.
 


सम्बन्धित सामग्री