Fraud Case: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला आहे. ही चौकशी तिचा पती राज कुंद्रा आणि त्यांच्याशी संबंधित 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाशी निगडीत आहे. प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी शिल्पाची तिच्या निवासस्थानी जवळपास 4 ते 5 तास चौकशी केली. तपासादरम्यान, अधिकाऱ्यांनी तिच्या जाहिरात कंपनीच्या बँक व्यवहारांची तपशीलवार माहिती मागितली. शिल्पाने चौकशीदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे सादर केली, जी आता पोलिसांच्या तपासाखाली आहेत.
हेही वाचा - Bharti Singh Second Preganancy : गोला होणार मोठा भाऊ!; भारती आणि हर्ष लवकरच करणार दुसऱ्या बाळाचं स्वागत
कंपनीच्या भूमिकेचा तपास सुरू
EOW अधिकारी कंपनीच्या भूमिकेचा आणि संपूर्ण आर्थिक व्यवहार रेकॉर्डचा आढावा घेत आहेत. या प्रकरणाशी संबंधित अनेक पुरावे अद्याप तपासात आहेत. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या थायलंडच्या फुकेत सहलीची विनंती नाकारली. जोडप्याने 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यानच्या सहलीसाठी परवानगी मागितली होती. मात्र, सरकारी वकिलांनी सांगितले की, दोघांविरुद्ध गंभीर आर्थिक गुन्ह्यांची दोन प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यामुळे परदेश प्रवासास परवानगी देणे योग्य ठरणार नाही.
हेही वाचा - Kantara Chapter 1 Collection: कांतारा चॅप्टर 1चा बॉक्स ऑफिसवर धमाका! फक्त 4 दिवसांत 200 कोटींचा आकडा पार, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचा कहर सुरूच
60 कोटी रुपयांचा फसवणुकीचा आरोप
मुंबईतील व्यावसायिक दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर 60.4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. कोठारी हे लोटस कॅपिटल फायनान्स सर्व्हिसेस या NBFCचे संचालक आहेत. त्यांच्या मते, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या होम शॉपिंग कंपनीच्या नावाखाली कर्ज मागितले होते. 2015 ते 2023 दरम्यान ही रक्कम गुंतवणूक आणि कर्ज म्हणून दिली गेली. मात्र ती नंतर वैयक्तिक कारणांसाठी वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही कंपनी सध्या बंद झाली असून, EOW या संपूर्ण व्यवहाराचा तपास करत आहे.