Friday, March 13, 2026 10:44:36 PM

Amitabh Bachchan Viral Poster: 'बायकोला सासरचे पाठवत नाहीयेत...'; अमिताभ बच्चन यांच्या हातातील पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल

या पोस्टरवर ठळक अक्षरात लिहिले होते, &quotमला पाठिंबा द्या, माझे सासरचे लोक माझ्या पत्नीला पाठवत नाहीत.&quot महानायकाच्या हातातील हे पोस्टर पाहून चाहते क्षणभर अवाक झाले.

amitabh bachchan viral poster बायकोला सासरचे पाठवत नाहीयेत अमिताभ बच्चन यांच्या हातातील पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Amitabh Bachchan Viral Poster: महानायक अमिताभ बच्चन दर रविवारी त्यांच्या 'जलसा' निवासस्थाबाहेर चाहत्यांना अभिवादन करतात. ही परंपरा 1982 पासून अविरत सुरू आहे. मात्र, गेल्या रविवारी (8 फेब्रुवारी 2026) चाहत्यांच्या भेटीला आलेल्या बिग बींच्या हातात चक्क एक अजब पोस्टर पाहायला मिळाले. या पोस्टरवर ठळक अक्षरात लिहिले होते, "मला पाठिंबा द्या, माझे सासरचे लोक माझ्या पत्नीला पाठवत नाहीत." महानायकाच्या हातातील हे पोस्टर पाहून चाहते क्षणभर अवाक झाले आणि आता याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

नेमके काय आहे या पोस्टरमागचे सत्य? 
अमिताभ बच्चन यांनी हे पोस्टर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी नाही, तर एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हाती धरले होते. या पोस्टरवर खाली "1982: अ लव्ह मॅरेज, 13 फेब्रुवारी 2026 रोजी थिएटरमध्ये" असा मजकूर लिहिलेला आहे. प्रत्यक्षात, तिथे आलेल्या एका व्यक्तीने बिग बींना हे पोस्टर धरण्याची विनंती केली होती. हा चित्रपट मूळचा 2019 मधील असून प्रशांत गोरे यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. 1 तास 53 मिनिटांच्या या चित्रपटात अमित कुमार शर्मा आणि आमना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या फेर-प्रदर्शनासाठी हे अनोखे प्रमोशन केल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा - Rakhi Sawant in Bigg Boss Season 6 : 'बिग बॉस'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री, राखी सावंतचा खेळ रंगणार, स्पर्धकांमध्ये वाढली धाकधूक 

नेटिझन्सच्या गमतीशीर प्रतिक्रिया आणि ट्रोलिंग 
हे पोस्टर व्हायरल होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. विशेषतः जया बच्चन यांच्या स्वभावाचा संदर्भ देत नेटकऱ्यांनी अमिताभ यांची फिरकी घेतली. एका युजरने लिहिले, "तुमची पत्नी जया बच्चन यांना सासरच्यांनी त्यांना तिकडेच ठेवलेले तुमच्यासाठी चांगले आहे," तर दुसऱ्याने कमेंट केली, "दुसऱ्याला पाठिंबा देताय ठीक आहे, पण स्वतःची पत्नी माहेरी गेली तर तुम्हाला काही दिवस शांतता मिळेल." "बायकोचा त्रास महानायकालाही सुटला नाही," अशा मिश्किल टिप्पणींनी कमेंट सेक्शन भरून गेले आहे.

बिग बींचे आगामी प्रोजेक्ट्स 
अमिताभ बच्चन सध्या 'कलकी 2898 AD' च्या सिक्वेलसह 'सेक्शन 84', 'द इंटर्न' आणि 'जवान' सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. त्यांचा लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती'चा 17 वा सीझन नुकताच संपला असून, आता चाहते त्यांच्या मोठ्या पडद्यावरील पुनरागमनाची वाट पाहत आहेत. दरम्यान, या व्हायरल पोस्टरमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, बिग बी जे काही करतात, त्याची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरते.
 


सम्बन्धित सामग्री