गेल्या काही वर्षांपासून भारतातील अनेकजण वेगवेगळ्या देशातील ड्रामा पाहतात. काहीजण कोरियन ड्रामा पाहतात तर काहीजण पाकिस्तानी ड्रामा पाहतात. मात्र भारतात असेदेखील काही प्रेक्षक आहेत, जे तुर्की ड्रामा खूप आवडीने पाहतात. जगभरात, तुर्की ड्रामा त्यांच्या दमदार कथा, उच्च निर्मितीमूल्ये आणि जबरदस्त अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. तुर्की ड्रामाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे याला अनेक भाषांमध्ये डब करण्यात आले आहेत. त्यासोबतच, तुर्की ड्रामा आपल्याला वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरदेखील पाहायला मिळतील. बुराक डेनिझ, हांडे एर्सेल, कैन यमन यासारखे अनेक तुर्की कलाकारांनी भारतामध्ये आणि जगभरामध्ये लोकप्रियता मिळवली आहे. जर तुम्ही सुद्धा ड्रामाचे शौकीन आहात, तर हे आहेत प्रसिद्ध तुर्की ड्रामा.
हेही वाचा: Civet Coffee: 'या' मांजरीच्या विष्टेपासून बनवली जाते भारतातील सर्वात महागडी कॉफी
1 - डे ड्रीमर (Day Dreamer):
डे ड्रीमर हा एक रोमँटीक कॉमेडी शो आहे. डे ड्रीमर 26 जून 2018 ते 6 ऑगस्ट 2019 दरम्यान प्रसारित झाला होता. या शोमध्ये कॅन यामान (Can Yaman) आणि देमेत ओझ्देमीर (Demet Özdemir) मुख्य भूमिकेत आहेत. ही कथा सनेम आयदिन (Sanem Aydın) नावाच्या एका उत्साही आणि स्वप्नाळू मुलीपासून सुरु होते. सनेमने (Sanem) लेखिका बनण्याचे स्वप्न पाहिले आहे. पण, सनेमच्या (Sanem) कुटुंबाने सनेमला (Sanem) तिच्या वडिलांच्या किराणा दुकानात काम करण्यासाठी भाग पाडले आहे. यादरम्यान ती एका मोठ्या संधीच्या शोधात असते. आपल्या बहिणीच्या ओळखीने, सनेम (Sanem) एका ऍड एजन्सीमध्ये काम सुरु करते. यादरम्यान, सनेम (Sanem) तिच्या बॉसच्या प्रेम पडते.
2 - प्यार लफजों मे कहाँ (Pyaar Lafzon Mein Kaha):
प्यार लफजों मे कहाँ हा एक रोमँटिक-ड्रामा शो आहे. प्यार लफजों मे कहाँ 2016 मध्ये प्रसारित झाला होता. या शोमध्ये बुराक डेनिझ (Burak Deniz) आणि हांडे एर्सेल (Hande Erçel) मुख्य भूमिकेत आहेत. ही कथा हयात (Hande Erçel) आणि मुरात (Burak Deniz) यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. या कथेची सुरुवात हयातपासून होते, जी एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी आहे. ती एका फॅशन कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी जाते, पण काही गैरसमजामुळे तिची ओळख सुमेर टेक्सटाईल कंपनीच्या CEO च्या सेक्रेटरी म्हणून होते. यादरम्यान, हयातची मुलाखत मुरात सारसिलमाझसोबत होते, जो कंपनीचा CEO आहे. सुरुवातीला तो हयातला फक्त एक कर्मचारी म्हणून पाहतो, पण हळूहळू दोघांमध्ये वाद, गैरसमज, आणि त्यानंतर आकर्षण निर्माण होते.
हयातने नोकरी मिळवण्यासाठी खोटे बोललेले असते आणि जेव्हा मुरातला हे सत्य कळते, तेव्हा त्याच्या भावनांना मोठा धक्का बसतो. मालिकेत त्यांचे भांडण, गैरसमज, आणि शेवटी प्रेमाची कबुली असा प्रवास दाखवण्यात आला आहे.
हेही वाचा: Bam Bam Bhole Song Teaser: सलमान खानच्या आगामी चित्रपटातील 'बम बम भोले' सॉंगचा टीझर रिलीज
3 - ब्लॅक मनी लव्ह (Black Money Love):
ब्लॅक मनी लव्ह हा गुन्हेगारी, गूढ, प्रेमकथा आणि थरार यांचे अनोखे मिश्रण आहे, जे 2014 ते 2015 मध्ये प्रसारित झाला होता. या शोमध्ये तुबा (Tuba Büyüküstün) आणि एंगिन आक्युरेक (Engin Akyürek) मुख्य भूमिकेत आहेत. ही कथा दोन प्रमुख पात्रांच्या आयुष्याभोवती फिरते – ओमेर डेमिर आणि एलिफ डेनिझेर. ओमेर हा एक प्रामाणिक आणि निडर पोलिस अधिकारी आहे. त्याला न्याय मिळवण्याचा ध्यास असतो. त्याची बदली इस्तंबूलमध्ये होते आणि तेथे त्याचा साखरपुडा होतो. पण लवकरच त्याचे आयुष्य एका मोठ्या धक्क्याने बदलते. एलिफ ही एक यशस्वी ज्वेलरी डिझायनर आहे आणि तिचे कुटुंब श्रीमंत आहे. ती रोममध्ये राहते आणि तिच्या व्यवसायात खूप प्रगती करत असते. मात्र, तिचे जीवन एका भयंकर सत्यामुळे उध्वस्त होते.