Zubin Garg Death Case: प्रसिद्ध आसामी गायक जुबिन गर्ग यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. सिंगापूर पोलिसांनी बुधवारी न्यायालयासमोर धक्कादायक खुलासे करत जुबिन गर्ग यांना संपवण्यात आलं नसून तो एक अपघात असल्याचे सांगितले. सिंगापूर पोलिसांच्या मुख्य तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात माहिती दिली की, लाजरस बेटाजवळ बोटीवर असताना जुबिन 'अत्यंत मद्यधुंद' अवस्थेत होते. सुरुवातीला त्यांनी लाईफ जॅकेट घातले होते, परंतु काही वेळाने ते काढून टाकले आणि दुसरे जॅकेट घालण्यास स्पष्ट नकार दिला.
घातपात की गैरप्रकार?
दरम्यान, अनेक साक्षीदारांनी त्यांना लाईफ जॅकेटशिवाय पोहण्याचा प्रयत्न करताना पाहिले, ज्या दरम्यान ते बेशुद्ध पडले. त्यांचा चेहरा पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या मृत्यूमागे कोणताही घातपात किंवा गैरप्रकार असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारली आहे. तपास अहवालात जुबिन गर्ग यांच्या प्रकृतीबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यांना उच्च रक्तदाब आणि अपस्माराचा (Epilepsy) त्रास होता, तसेच 2024 मध्ये त्यांना शेवटचा झटका आला होता, असे न्यायालयाला सांगण्यात आले. सप्टेंबर 2024 मध्ये ईशान्य भारत महोत्सवात सादरीकरण करण्याच्या एक दिवस आधी 52 वर्षीय जुबिन यांचा मृत्यू झाला होता. त्यांना बेशुद्ध अवस्थेत बोटीवर आणून सीपीआर (CPR) देण्यात आला होता, मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
हेही वाचा - Tejaswini Pandit: 'कुणालाही सरसकट मत देऊ नका!’ तेजस्विनी पंडितची इंस्टग्राम पोस्ट चर्चेत, मतदारांना थेट इशारा
सिंगापूर पोलिसांनी ही माहिती दिली असली, तरी आसाम पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) मात्र या प्रकरणात कट असल्याचा आरोप करत आरोपपत्र दाखल केले आहे. तथापी, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील आसाम सरकारने या मृत्यूमागे संशय व्यक्त केला असून, या प्रकरणी महोत्सवाचे आयोजक, गायकाचे सचिव, बँड सदस्य आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसह सात जणांना अटक केली आहे.
हेही वाचा - Stray Dogs Issue: भटक्या कुत्र्यांचा वाद पेटलेला असतानाच मोठी घोषण! सुप्रसिद्ध गायक देणार 10 एकर जमीन; नेमकं प्रकरण काय?
आसाम पोलिसांनी या हत्येप्रकरणी चार जणांवर थेट आरोप लावले आहेत. हे प्रकरण कायदेशीररीत्या मार्गी लावण्यासाठी आसाम सरकारने वरिष्ठ वकील झियाउल कमर यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय विशेष सरकारी वकिलांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. सिंगापूर पोलिसांचा अपघाताचा दावा आणि आसाम पोलिसांचा आरोप यामुळे आता या प्रकरणातील कायदेशीर लढाई अधिक गुंतागुंतीची झाली आहे.