Wednesday, June 25, 2025 12:45:15 AM

मित्राच्या लग्नात डान्स करताना TV अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका; 34 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हा विनोदी कलाकार त्याच्या मित्राच्या मेहंदी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेला होता. याच दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.

मित्राच्या लग्नात डान्स करताना tv अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका 34 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Rakesh Pujari
Edited Image

Rakesh Pujari Passes Away: मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अभिनेते राकेश पुजारी यांचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. हा विनोदी कलाकार त्याच्या मित्राच्या मेहंदी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेला होता. याच दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. राकेश पुजारीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत.

कार्यक्रमात अचानक बेशुद्ध पडला अभिनेता - 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, डुपी जिल्ह्यातील करकला येथील निट्टेजवळ ही दुर्दैवी घटना घडली. हा विनोदी कलाकार त्याच्या मित्राच्या मेहंदी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेला होता. तिथे रविवारी रात्री उशिरा तो अचानक बेशुद्ध पडला. त्याला घटनास्थळी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण विनोदी कलाकाराला वाचवता आले नाही. याप्रकरणी करकला टाउन पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'या' शोमधून मिळाली होती ओळख - 

राकेश पुजारीला 'कॉमेडी खिलादिलू सीझन 3' या कन्नड रिअॅलिटी शोमधून लोकप्रियता मिळाली. 2020 मध्ये प्रसारित झालेल्या या शोमध्ये विजय मिळवल्यानंतर, राकेशला कर्नाटकातील प्रत्येक घरात ओळख मिळाली. खिलादिलू सीझन 3च्या आधी, राकेश पुजारी 2018 मध्ये त्याच शोच्या सीझन 2 च्या उपविजेत्या संघाचा भाग होता.

हेही वाचा - स्वामी योचं भविष्य ठरलं खरं? रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आधीच स्वामींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’चं भाकीत

राकेश पुजारी यांच्या आकस्मिक निधनाची बातमी कळताच, किरिक कीर्ती यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या आत्म्याच्या चिरशांतीसाठी प्रार्थना केली. शोक व्यक्त करताना त्यांनी लिहिले की, 'आज सकाळीच खूप वाईट बातमी आली.. राकेश पुजारी आता राहिले नाहीत.. सर्वांना भाऊ-बहीण म्हणणारा नेहमीच हसणारा, प्रेमळ भाऊ.. इतक्या लहान वयात इतके क्रूर नशिब.. हे हृदयविकार होण्याचे वय आहे का?.. तुमच्या निधनाच्या बातमीने आम्हाला खूप दुःख झाले आहे.. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो..'

हेही वाचा - चित्रपटांवर 100 टक्के कर! ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतीय चित्रपटसृष्टीवर काय परिणाम होणार?

राकेश पुजारी यांची चित्रपट कारकीर्द - 

राकेश पुजारी यांनी चैतन्य कलाविदारू थिएटर ग्रुपमधून सादरीकरण कलेच्या क्षेत्रात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. 2014 मध्ये, तो पहिल्यांदा 'कडले बाजील' या तुळु रिअॅलिटी शोमध्ये दिसला. हा कार्यक्रम एका खाजगी वाहिनीवर प्रसारित झाला होता. याशिवाय तो 'पैलवान' आणि 'इदू एन्था लोकावय्य' सारख्या चित्रपटांचाही भाग होता. त्यांच्या इतर चित्रपटांमध्ये 'इलोक्केल', 'अम्मर पोलिस', 'पम्मन्ना द ग्रेट' आणि 'उमिल' यांचा समावेश आहे.
 


सम्बन्धित सामग्री