Saturday, December 06, 2025 11:12:43 AM

Kamini Kaushal Death: दिलीप कुमार, धर्मेंद्रसोबत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड

अशोक कुमार, राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कुमार अशा दिग्गज नायकांसोबत त्यांनी काम केले.

kamini kaushal death दिलीप कुमार धर्मेंद्रसोबत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड

Kamini Kaushal Death: बॉलिवूडमधून दुःखद बातमी समोर आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामिनी कौशल यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. “दो भाई”, “शहीद”, “नदिया के पार” आणि “जिद्दी” यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम करणाऱ्या या दिग्गज अभिनेत्रीच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. कौशल यांच्या कुटुंबाने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.  

कामिनी कौशल कोण होत्या?

24 फेब्रुवारी 1927 रोजी लाहोर येथे उमा कश्यप म्हणून जन्मलेल्या कामिनी कौशल यांनी 1940 ते 60 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र छाप निर्माण केली. अशोक कुमार, राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कुमार अशा दिग्गज नायकांसोबत त्यांनी काम केले. त्यांच्या नैसर्गिक अभिनयशैलीमुळे त्या त्या काळातील प्रेक्षकांच्या सर्वाधिक आवडत्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या.

हेह वाचा - Sunny Deol Angry On Paparazzi: तुमच्या घरी तुमचे आईवडील नाहीत का? घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना सनी देओलने केला संतप्त सवाल

करिअरची सुरुवात  

कामिनी कौशल यांनी चेतन आनंद यांच्या ‘नीचा नगर’ मधून पदार्पण केले. हा चित्रपट केवळ भारतात नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता पावला आणि कान्स चित्रपट महोत्सवात पाल्मे डी’ओर मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. याचबरोबर “बिराज बहू” (1956) मधील दमदार भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारही मिळाला.

हेही वाचा - Govinda Health Update: अभिनेता गोविंदा यांना 24 तासांच्या आत डिस्चार्ज; स्वतः सांगितलं प्रकृती बिघडण्याचं खरं कारण, म्हणाले 'मी अति...

बहिणीच्या पतीसोबत केलं लग्न 

कौशल यांनी बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे माजी मुख्य अभियंता ब्रह्म एस. सूद यांच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे ते त्यांच्या बहिणीचे पती होते. बहिणीचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर दोघांचे लग्न झाले आणि त्यावर त्या काळात बरीच चर्चा झाली. लग्नानंतर काही वर्षे चित्रपटांपासून दूर राहिलेल्या कामिनी कौशल यांनी नंतर पुन्हा अभिनयात मजल मारली आणि नव्या पिढीलाही त्यांनी आपलेसे केले.

शाहरुख, शाहिद, आमिरसोबत काम

कामिनी कौशल यांनी चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुख खानच्या आजीची भूमिका, कबीर सिंगमध्ये शाहिद कपूरच्या आजीची भूमिका, तसेच लाल सिंग चड्ढामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. त्यामुळे त्या नव्या पिढीच्या प्रेक्षकांनाही परिचित झाल्या. प्राध्यापक शिव राम कश्यप यांच्या कन्या असलेल्या कामिनी कौशल यांचे योगदान भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य आहे. अभिनयातील साधेपणा, नैसर्गिकता आणि सात दशकांचा विस्तृत प्रवास यामुळे त्या कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीने आज एक महान कलाकार गमावला आहे.


सम्बन्धित सामग्री