Tuesday, November 18, 2025 10:01:24 PM

Veteran Actor Satish Shah Passes Away: ज्येष्ठ अभिनेता सतीश शाह यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सतीश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत टीव्ही आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केली.

veteran actor satish shah passes away ज्येष्ठ अभिनेता सतीश शाह यांचे निधन 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Satish Shah Death: बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. त्यांच्या निकटवर्तीय आणि चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. अशोक पंडित यांनी त्यांच्या एक्स (Twitter) अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, 'सतीश सुरुवातीला घरी होते, परंतु मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांची तब्येत बिघडली. त्यांना दादर येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.' 

दरम्यान, 26 ऑक्टोबर रोजी सतीश शाह यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांचे पार्थिव सध्या रुग्णालयात आहे. सतीश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत टीव्ही आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केली. “ये जो है जिंदगी”, “मेनें प्यार किया”, “हम आपके हैं कौन”, “ओम शांती ओम” अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - Abhang Tukaram Sanskrit Teaser : अजून काय हवं! चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत; ‘अभंग तुकाराम’ चित्रपटासाठी चाहत्यांची अनोखी भेट !

हेही वाचा - New OTT Releases : द कार्दशियन ते परम सुंदरी! 'या' ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची पर्वणी

सतीश शाह यांची कारकीर्द केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर टेलिव्हिजनवरही यशस्वी ठरली. त्याने "साराभाई vs साराभाई" सारख्या शोसह अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केले. अभिनेत्याच्या जाण्याने केवळ त्याच्या कुटुंबालाच नाही तर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.  
 


सम्बन्धित सामग्री