Monday, November 17, 2025 05:55:37 AM

Thalapathy Vijay: टीव्हीके पक्षाची स्थापना करणारा विजय थलापती कोण? त्याची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

शनिवारी, तामिळनाडूतील करूर येथे लोकप्रिय दक्षिणात्य अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख विजय थलापती यांच्या रॅलीत  भीषण चेंगराचेंगरी झाली.

thalapathy vijay टीव्हीके पक्षाची स्थापना करणारा विजय थलापती कोण त्याची एकूण संपत्ती किती जाणून घ्या

चैन्नई: शनिवारी, तामिळनाडूतील करूर येथे लोकप्रिय दक्षिणात्य अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख विजय थलापती यांच्या रॅलीत  भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला, तर 60 हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेत सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर, देशभरात संताप व्यक्त होत आहे. अशातच, अनेकांना प्रश्न पडला असेल की विजय थलापती कोण आहे? टीव्हीके पक्षाची स्थापना कधी झाली? विजय थलापतीची संपत्ती किती असेल?. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

विजय थलापती कोण आहे?

विजय थलापतीचा जन्म 22 जून 1974 रोजी चैन्नईमध्ये झाला. विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर असून ते एक चित्रपट दिग्दर्शक आहेत. यासह, विजयची आई शोभा चंद्रशेखर आहेत. व्यवसायाने विजयची आई पार्श्वगायिका आहे. विजयने त्याचे शालेय शिक्षण कोडंबक्कम येथील फातिमा शाळेत आणि नंतर विरुगमक्कम येथील बाललोक शाळेत पूर्ण केले. त्यानंतर, विजयने लोयोला कॉलेजमधून व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये बॅचलर पदवी घेतली. मात्र, अभिनय क्षेत्रात लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने शिक्षण सोडले.

1984 मध्ये विजय थलापतीने पीएस वीरप्पा निर्मित वेत्री या तमिळ चित्रपटात बालकलाकार म्हणून पदार्पण केले. यानंतर, विजयने कुडुंबम (1984), वसंता रागम (1986), सत्तम ओरू विलायत्तू (1988) आणि 1986 (1986) यांसारख्या चित्रपटांतही बाल कलाकार म्हणून काम केले. 

1992 मध्ये विजयने नालैया थीरपू चित्रपटातून टॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटानंतर, विजयने सेन्थूरापांडी, रसिगन, देवा आणि कोइम्बतूर मप्पिल्लई चित्रपटांतही काम केले, जे बॉक्स ऑफिसमध्ये ब्लॉकबस्टर ठरले. यानंतर, 1996 मध्ये विक्रमनने दिग्दर्शन केलेल्या पूवे उनाक्कागा चित्रपटात विजयने काम केले. या चित्रपटाने विजयला लोकप्रियता दिली. 1992 ते 2024 पर्यंत विजय थलापतीने तब्बल 68 चित्रपटात काम केले. 

टीव्हीके पक्षाची स्थापना कधी झाली?

मागील काही काळापासून विजय थलापती राजकारणात प्रवेश करणार अशी अफवा पसरत होती. इतकंच नाही, तर विजयची टीम गेल्या अनेक वर्षांपासून विजयचे सामाजिक कार्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत होते. विजय सातत्याने गरिबांना मदत करत असे, गरजवंतांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या आरोग्याशी संंबंधित कार्यक्रम चालवत असे. विजय एक एनजीओ देखील चालवतो ज्याचे नाव आहे विजय मक्कल लयक्कम. या एनजीओच्या माध्यमातून तो हे सर्व उपक्रम राबवत असे. मात्र, काही कालावधीनंतर, विजयने 2 फेब्रवारी 2024 रोजी तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाची स्थापना करण्याची अधिकृत घोषणा केली. विजयने या घोषणेमुळे, तामिळनाडू राज्यातील राजकारणात खळबळ उडाली. 

हेही वाचा: TVK Vijay Rally Stampede: चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांसाठी विजय थलापतींच मोठी घोषणा; प्रत्येक कुटुंबाला 20 लाखांची मदत

विजय थलापतीची संपत्ती किती?

मिळालेल्या माहितीनुसार, विजय थलापतीची एकूण संपत्ती सुमारे 600 कोटी भारतीय रुपये आहे. विजय भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. एका चित्रपटासाठी विजय थलापती अंदाजे 100 ते 120 कोटी रुपये घेतो. यासह, ब्रँड एंडोर्समेंट आणि रिअल इस्टेटमधून विजयची अतिरिक्त कमाई होते. सूत्रांनुसार, ब्रँड एंडोर्समेंटसाठी विजय अंदाजे 10 कोटी रुपये आकारतो. 


सम्बन्धित सामग्री