मुंबई: 'पठाण', 'वॉर' आणि 'फायटर' सारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले चित्रपट निर्माते सिद्धार्थ आनंद यांनी 'ऊंचाई' आणि 'नागझिला' चे निर्माते महावीर जैन यांच्याशी हातमिळवणी केली आहे. दोघांनीही त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'व्हाइट' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. 'व्हाइट' हा एक अतिशय रोमांचक जागतिक थ्रिलर चित्रपट असणार आहे ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी प्रसिद्ध आध्यात्मिक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
चित्रपटाची तयारी सुरू -
'व्हाइट' या चित्रपटाची तयारी कोलंबियामध्ये सुरू होत असून जुलैमध्ये त्याचे चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. कोलंबियातील 52 वर्षांच्या क्रूर यादवी युद्धाचा अंत कसा झाला याची प्रेरणादायी कहाणी प्रदर्शित करण्यासाठी हा चित्रपट एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय टीमला एकत्र आणतो. हा एक असा अध्याय आहे जो अजूनही जगभरात फार कमी लोकांना ज्ञात आहे.
हेही वाचा - उच्च न्यायालयाचा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा
विक्रांत मेस्सी लांब केस आणि इतर शारीरिक परिवर्तनांसह दिसल्यानंतर या चित्रपटात त्यांच्या भूमिकेबद्दल अनेक अटकळा बांधल्या जात आहेत. अखेर आता विक्रांत मेस्सी श्री श्री रविशंकर यांची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे. '12वी फेल' आणि 'द साबरमती रिपोर्ट' सारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रशंसा मिळवणारा विक्रांत मेसी त्याच्या परिवर्तनाने प्रेक्षकांना सतत प्रभावित करत आहे.
हेही वाचा - 'अबीर गुलाल' भारतात प्रदर्शित होणार नाही; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटावर बंदी
'व्हाइट' हा चित्रपट प्रसिद्ध जाहिरात दिग्दर्शक मोंटू बासी यांनी दिग्दर्शित केला असून सिद्धार्थ आनंद आणि महावीर जैन यांच्यासह पीसक्राफ्ट पिक्चर्सने या चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. सिनेमा आणि कथाकथनाच्या कलेत तज्ज्ञ असलेल्या निर्मात्यांच्या या टीमसह, 'व्हाइट' हा भारतातील एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प असणार आहे, जो शांतता आणि मानवतेची एक अकथित कहाणी जागतिक व्यासपीठावर आणेल.