चित्रकूट: मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील एका छोट्या गावातील तरुणी मीनाक्षी सिंगने मिस साउथ एशिया युनिव्हर्सचा किताब जिंकून राज्याचा अभिमान वाढवला आहे. ती आता मिस एशिया युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. मीनाक्षीला लहानपणापासून नृत्य आणि मॉडेलिंगचा छंद आहे. मीनाक्षीची आई कम्युनिकेशन वर्क्स कमिटीची अध्यक्षा आहे.
कोण आहे मीनाक्षी सिंग ?
मीनाक्षी ही अकरावीची विद्यार्थिनी आहे. सध्या ती इंदूरमध्ये राहून तिचे शिक्षण पूर्ण करत आहे. चित्रकूटच्या सरधुवा गावात त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. चित्रकूट जिल्ह्यातील सरधुवा गावातील रहिवासी सत्यभान सिंग आणि कीर्ती सिंग यांची मुलगी मीनाक्षी सिंगने मिस साउथ एशिया युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे.
हेही वाचा - स्वामी योचं भविष्य ठरलं खरं? रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आधीच स्वामींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’चं भाकीत
मिस एशिया युनिव्हर्समध्ये केले देशाचे प्रतिनिधित्व -
दिल्लीत झालेल्या या स्पर्धेत मीनाक्षीने तिच्या अनेक स्पर्धकांना हरवून हा किताब जिंकला. मीनाक्षी सिंगला यापूर्वी मिस टीन एज (क्वीन ऑफ द हॅट्स), मिस टीन इंडिया आणि मिस टीन एमपी सारख्या अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!' राखी सावंतचा Video पाहून भारतीयांचा संताप
मीनाक्षीने सांगितले की, तिने यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच या स्पर्धा तिने जिंकल्या देखील आहेत. ती आता मिस एशिया युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. आता ती युनायटेड स्टेट्स मध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही स्पर्धा चार महिन्यांनी होईल, असा अंदाज आहे.