Wed. Dec 11th, 2019

आदिवासी महिलांचं हस्तकौशल्य, पर्यावरणपूरक बांबूच्या राख्या!

वनवासी भागात सामाजिक शैक्षणिक व रोजगार निर्मितीसाठी कार्य करणाऱ्या विवेक रूरल डेवलोपमेंट सेंटरच्या माध्यमातून वनवासी महिलांना प्रशिक्षित करून त्यांच्याकडून बांबूंपासून हस्तकलेच्या बहुपयोगी निरनिराळ्या आकर्षक वस्तू तयार करण्यात येतात. ही उत्पादनं उच्च प्रतीची आणि दर्जेदार असल्याने त्यांना मागणी जास्त आहे.

वनवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक बांबूंच्या आकर्षक राख्यांना बाजारपेठेत मागणी वाढतेय. बहीण भावाच्या नात्याला घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय. रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर वसईच्या बाजारात बांबूंपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक राख्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

रुरल डेव्हलपमेंट संस्था गेल्या 3 वर्षांपासून महिलांना रोजगार प्राप्ती व्हावी म्हणून पालघर जिल्ह्यात कार्य करत आहे.

यामध्ये बांबू हस्तकलेचा समावेश असून प्रशिक्षित महिला 21 प्रकारची आकर्षक उत्पादनं तयार करत आहेत.

ही उत्पादने खूपच चांगल्या प्रकारची आणि दर्जेदार असल्याने त्यांना पुरस्कृत केलंय.

बांबूच्या राख्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य, नैसर्गिक रंग हे सर्व संस्थेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आदिवासी महिलांना घरकाम सांभाळून कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा, या हेतूने महिलांना बांबू हस्तकलेचं मोफत प्रशिक्षण देण्यात येतं.

12 प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येत असून यामध्ये अनेक प्रकारच्या बांबूच्या वस्तू यासह राख्यांची निर्मिती प्रशिक्षण देण्यात येतं.

या मोफत प्रशिक्षणातून अजपर्यंत 150 हुन अधिकजणांनी आणि त्यातही 80 हून जास्त महिलांनी आपला लघु उद्योग थाटलाय. यामुळे प्रत्येक महिला 5 ते 8 हजार रुपयांचा आर्थिक लाभ घेतेय.

बांबूच्या राख्या 5 प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. गंगा , सरस्वती, यमुना , कावेरी, गोदावरी अशी नावं राख्यांना देण्यात आली आहेत.

या बनवलेल्या राख्यांची विक्री करण्यासाठी केंद्रदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पालघर जिल्ह्यासह वसई तालुक्यातील शाळा , महाविद्यालये महिला तर राष्टीय महामार्ग अश्या ठिकाणी विक्री केंद्र उभारून देण्यात आली आहेत या बनविल्या राख्याची किंमत 25 ते 30 रुपये इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *