Wed. Jan 19th, 2022

इथिओपियन एअरलाईन्सचे विमान कोसळले

इथिओपियन एअरलाईन्सचे बोईंग ७३७ विमान अदिस अबाबा येथून केनियातील नैरोबी येथे जात असलेले विमान कोसळले आहे. या विमानात ८ क्रू सदस्य आणि १५७ प्रवासी प्रवास करत होते. इथिओपियातील पंतप्रधान कार्यलयाने दिलेल्या माहितीनुसार हे विमान सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कोसळलं. या अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती एका वृत्ताने दिली आहे.

नेमकं काय घडलं ?

इथिओपियन एअरलाइन्सचे एक विमान कोसळ्याची घटना घडली.

हा अपघात अदिस अबाबा येथून नैरोबी येथे जात असताना घडला.

बोईंग ७३७ विमानाने सकाळी ८.३०च्या सुमारास अदिस अबाबा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले.

मात्र काही वेळातच कंट्रोल रुमशी संपर्क झाला नाही म्हणून सर्च आणि रेसक्यू ऑपरेशन सुरू केले.

मात्र काही वेळाने  १५७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *