Jaimaharashtra news

बारावी मुल्यांकनाचा फॉर्म्युला ठरला

इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण ३० टक्के, अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण ३० टक्के, इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण ४० टक्के असे निकष ठरवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाकडून निकालासाठी मुख्याध्यापक /प्राचार्य यांच्यासह कमाल ७ सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्यात येईल. निकालासंबंधित सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

याशिवाय पुनर्परिक्षार्थी म्हणून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहावीतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण ५० टक्के आणि बारावीतील सर्व चाचण्या, गृहप्रकल्प, तत्सम अंतर्गत मूल्यमापनाचे ५० टक्के गुण समाविष्ट असतील. तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (दिव्यांग विद्यार्थ्यांसहित) ऑनलाईन , दूरध्वनीद्वारे एकास एक वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन करून नोंदी करून गुण देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

Exit mobile version