Wed. Jan 26th, 2022

भाजपशी ‘युती’, पण शिवसेना स्वतंत्र बाण्याची संघटना – उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकांवेळी राज्यात युतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुका पुन्हा एकत्र लढवणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र जरी भाजपाशी युती असली तरी शिवसेना स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. तसेच आगामी विधानसभा भगवी करून टाकू. उद्धव ठाकरे यांनी  पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेचा आज 53वा वर्धापन दिन असून अग्रलेखातून त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा –

शिवसेनेचा आज 53वा वर्धापन दिन असून त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजपाशी युती असली तरी शिवसेना स्वतंत्र बाण्याची संघटना आहे.

तसेच आगामी विधानसभा निवडणुका भगवी करून टाकू  आणि त्यासाठी कामाला लागावे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या अग्रलेखात त्यांनी पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे.

काय आहे अग्रलेखात –

शिवसेना नावाचे वादळ 52-53 वर्षांपासून महाराष्ट्रात घोंघावत आहे.

शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, पोटपाण्याच्या आणि रोजगाराच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला.

त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंवर अनेक वार झाले.

मात्र आपल्याच माणसांच्या बाजूने उभे राहणे त्यांच्यासाठी गुन्हा ठरला.

शिवसेनेची भुमिपुत्रांची भूमिका घेऊन पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी लढत आहेत.

दक्षिणेतील प्रत्येक राज्य प्रांतीक अस्तितेचे राजकारण करत आहेत.

राष्ट्रीय पक्षही प्रादेशिक पक्षाशी युत्या-आघाडय़ाकरून आपला आकडा वाढवीत आहेत.

शिवसेनाप्रमुखांनीच हा प्रांतीय अस्मितेचा विचार मांडला होता त्याला देशाने स्विकारले असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *