Sun. May 16th, 2021

#PulwamaTerrorAttack : शहिदांच्या कुटुंबियांना या राज्यांकडून मदत

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी भ्याड हल्ला झाला आहे.

या हल्ल्यांत सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले आहे.

हल्ल्यांत शहीद झालेल्या 40 जवानांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी प्रत्येक राज्यातील सरकार पुढे सरसावली आहे.

महाराष्ट्र, आसाम, ओदिशा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

कोणत्या राज्याची किती मदत ?

उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक 12 जवान शहीद झाले आहेत. या जवानांच्या कुटुंबाला उत्तर प्रदेश सरकरने प्रत्येकी 25 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी ही देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र – महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हयातील दोन जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. या जवानांच्या कुटुंबियांना सरकारने प्रत्येकी 50 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.

आसाम आसाम सरकारने  शहीद सीआरपीएफ जवान मुनेश्वर बासुमतरी यांच्या कुटुंबियांना 20 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

राजस्थान राजस्थानचे पाच जवान या हल्ल्यात शहीद झाले. या शहिदांच्या कुटुंबियांना राजस्थान सरकारने प्रत्येकी 25 लाख रुपये आणि कुटुंबियांपैकी एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच, शहीद जवानांच्या पत्नीला, त्यांच्या आई-वडिलांना आणि त्यांच्या मुलांनाही अनेक सवलती देण्यात येणार आहेत.

ओडिशा या हल्ल्यांत ओडिसामधील दोन जवान शहीद झाले. या शहीद जवानांच्या कुटुंबाला ओडिशा सरकारने प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

झारखंड   झारखंडमधून 1 जवान शहीद झाला. या जवानाच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत आणि नातेवाईकांपैकी एकाला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे.

हिमाचल प्रदेश – हिमाचल प्रदेशमधील जवान तिलक राज यांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  

उत्तराखंड  उत्तराखंड राज्यातील जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच कुटुंबातील एकास सरकारी नोकरी देण्यात येणार आहे.

त्रिपुरा त्रिपुरा राज्य सरकारने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *