Jaimaharashtra news

औरंगाबादमध्ये पंतप्रधान मोदींच्या ‘या’ मोठ्या घोषणा

दिल्ली-मुबंई कॉरिडॉरच्या ऑरिक सिटीचं लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडल्यानंतर नागरिकांना संबोधित केले. तसेच राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित होते. यावेळी मोदींनी महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑरिक सिटीचा लोकार्पण सोहळा औरंगाबादमध्ये पार पडला.

यावेळी राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्यासाठी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

उज्ज्वला योजनेचा संकल्प पूर्ण झाला असल्याचे मोदींनी सांगितले.

8 कोटी गॅस कनेक्शन देण्याचा संकल्प पूर्ण केला असून 8 कोटींपैकी 44 लाख गॅस फक्त महाराष्ट्रात देण्यात आले आहे.

देशाच्या विकासात ग्रामीण भागाचे मोठे योगदान असल्याचे मोदी म्हणाले.

बचतगटाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण होत आहे.

शौचालय, पाणी महिलांच्या दोन समस्या आहेत.

दोन्ही समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत.

गावांची आर्थिक स्थिती सुधारणार असल्याचे म्हटलं आहे.

महिलांना राष्ट्राच्या विकासात सहभागी करू असे मोदी म्हणाले.

पाण्यासाठी साडेतीन लाख कोटी खर्च करणार.

महिलांना एक लाखापर्यंत कर्ज मिळणार.

महिलांच्या खात्यात 5 हजार कायम असणार.

खात्यात पैसे नसले तरी महिला 5 हजार काढू शकणार असे मोदी म्हणाले.

2022 पर्यंत प्रत्येक गरिबाला पक्कं घर देण्याचा प्रयत्न.

घराच्या नावावर फक्त चार भिंती नाही द्याच्या.

गरिबांना त्यांच्या हक्काचे घर द्यायचं.

घरात प्रत्येक सुविधा देण्याचा प्रयत्न.

हाऊस नाही तर होमचं निर्माण करतोय.

लोकांच्या गरजा लक्षात ठेऊन घरं बांधली.

 

 

 

 

Exit mobile version