Sat. May 25th, 2019

मोदी असो वाड्रा भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी झाली पाहिजे – राहुल गांधी

207Shares

राफेल करार प्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारात काय केलं याबाबत सर्वांना माहिती आहे. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत काही बोलत नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेकदा राफेल करार प्रकरणी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले आहेत. मात्र ते उत्तर देत नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटल ंआहे. तसेच जामीन घोटाळ्या प्रकरणी रॉबट वाड्रा यांची चौकशी होत आहे. तसेच ते चौकशीत सहकार्य करत आहेत असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. मग मोदी असो किंवा वाड्रा यांची भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ?

राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

चेन्नई येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणी मौन धारण केल्याचे म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी राफेल करारात काय केले आहे याबद्दल संपूर्ण देशाला माहिती आहे.

रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी होत असून ते तपासात सहकार्य करत आहेत.

म्हणून मोदी असो किंवा वाड्रा त्यांची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांचे नाव ऐकले आहे का ? तुम्ही अनिल अंबानी यांचे नाव ऐकले आहे का ? असा प्रश्न विचारत या सर्वांनी मोदींना पैसे दिले आहेत असा आरोप लावला.

मोदींचे नाव राफेलच्या कागदपत्रात आहे मग त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांनी मौन का बाळगले आहे असा सवाल केला.

भारतात सध्या विचारधारेची युद्ध सुरू आहे. एक म्हणजे सर्वांनी एकत्र यावे, सुख, शांती असावी आणि दुसरे म्हणजे पंतप्रधानांची आहे.

एकाच विचारावर देश चालावा अशी पंतप्रधानांची विचारधारा आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *