Tue. Sep 28th, 2021

भीषण! 5 वर्षांच्या चिमुरडीच्या सर्वांगावर मेणबत्तीचे चटके!

मुलगी मस्ती करते म्हणून आपल्या 5 वर्षाच्या पोटच्या पोरीला आईने संपूर्ण अंगावर मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना कळंबोली मध्ये समोर आली आहे.

 

काय घडलं नेमकं?

मुलीचे वडील घनश्याम यादव भाजी विक्रेते आहेत.

जेव्हा ते कामावरून घरी आले, तेव्हा आपल्या चिमुकली अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला.

ते घरी नसताना त्यांची 5 वर्षांची मुलगी साक्षी ही मस्ती करत होती.

म्हणून आई अनिता आणि काकू रिंकी यादव या दोघींनी मिळून तिच्या सर्वांगावर मेणबत्तीने चटके दिले.

हे चटके कोणी दिल्याची विचारणा मुलीकडे केल्यावर तिने आपली आई व काकी चे नाव घेतले.

हे ऐकल्यावर घनश्याम यांनी थेट कळंबोली पोलिस ठाणे गाठले आणि घडल्या प्रकारची माहिती दिली.

गुन्हा दाखल करताच कळंबोली पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.

साक्षीची आई अनिता यादव आणि काकू रिंकी यादव यांना अटक करण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *