Tue. Aug 3rd, 2021

EVM विरोधात फेरयाचिका दाखल करणार – चंद्राबाबू नायडू

ईव्हीएम प्रणालीच्या विरोधात सर्व विरोधक पुन्हा एकदा एकवटले आहेत. सर्वोच्च न्यायालयात याविरोधात उद्या फेरयाचिका दाखल करणार असल्याच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगीतलं आहे. ईव्हीएमच्या विरोधात 23 पक्षांनी मुंबईत एकत्र पञकार परिषद घेतली आहे. यामध्ये ईव्हीएम देशासाठी कसे घातक आहे याबाबतचं सादरीकरण करण्यात आलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रफुल्ल पटेल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे, तृणमल काँग्रेसचे खासदार आणि इतर विरोधी पक्षाचे नेते या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. नरेंद्र मोदींना लोकांतून जरी विरोध असला तरी ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार झाल्यास तो चिंतेचा विषय आहे. असं म्हटलं आहे.

ईव्हीएम प्रणालीवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंसह नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

ईव्हीएम देशासाठी कसे घातक आहे हे या पत्रकार परिषदेत सादर करण्यात आलं आहे.

मतमोजणीच्या वेळेस 50% व्हीवीपॅटमधील रिसीटचीही मोजणी करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.

विशेष म्हणजे निवडणूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम वर 9000 कोटी खर्च येत येतो असं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात याविरोधात उद्या फेरयाचिका दाखल करणार असल्याच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी सांगीतलं आहे

गोवा, उत्तर प्रदेश आणि केरळमधून सदोष ‘ईव्हीएम’बाबत तक्रारी पुढे आल्या आहेत.

लोकशाही वाचवण्यासाठीच आम्ही ‘ईव्हीएम’बाबत जनजागृती करण्याचे ठरवले आहे, असे चंद्राबाबू नायडू म्हणालेत आहे.

रशियन हॅकर करोडो रुपयांच्या बदल्यात ईव्हीएम हॅक करतात, असा दावाही नायडू यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *