Tue. Jul 14th, 2020

मावळमध्ये मतदान करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

लोकसभा निवडणुकीच्या देशात चौथा तर राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू असून नागरिकांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा लावल्या आहेत. देशातील ९ राज्यात ७१ जागांवर मतदान सुरू आहे. महाराष्ट्रात १७ मतदारसंघात मतदान होत आहेत. यावेळी मावळ मतदारसंघातही मतदान पार पडत असताना एका व्यक्तीने मतदान करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नेमकं काय घडलं ?

महाराष्ट्रात १७ मतदारसंघात मतदान पार पडत आहे.

१७ मतदारसंघांपैकी मावळ येथे मतदान सुरू आहे.

मात्र एका व्यक्तीने मतदान करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

मतदान केंद्रात जाण्यापूर्वी मोबाईल बंद करण्याचे आदेश देण्यात येतात.

मात्र तरीही लोकं व्हिडीओ काढत असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

मतदाराने EVM मशीनमध्ये कोणाला मतदान केल्याचेही स्पष्ट दिसत आहे.

यापूर्वी मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी शेकापचे कार्यकर्ते २०० रुपये वाट असताना पकडले असल्याची घटना घडली होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *